शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

देशात भाजपला मित्रपक्षच उरला नाही, त्यामुळे २०२४ मध्ये...; सुभाष देसाईंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 13:14 IST

...तो पर्यंत कुठलीही शक्ती शिवसेनेला नमवू शकत नाही. राहीले ते निष्ठावान मावळे,उडाले ते कावळे अशी खरमरीत टीकाही भाजप आणि शिंदे गटावर शनिवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली.

मधुकर ठाकूर 

उरण - देशात अनेक राज्यात भाजपला आता मित्रपक्ष उरलेले नाहीत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजपचा इजा,बिजा आणि पराभवाचा तिजा होणार असल्याची जोरदार टीका माजी मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उरण येथील जाहीर कार्यक्रमातून केली.  

उरण विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने शनिवारी (४) शिवगर्जना अभियान व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.जेएनपीटी कामगार वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेना नेते सुभाष देसाई कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्रातील अनेक उद्योग राज्यातून गुजरातमध्ये नेऊन राज्याचे नुकसान केले आहे. पक्षाचे नाव, चिन्हही घेतलेत.  मात्र निष्ठावंत प्रामाणिक शिवसैनिकांकडे जोपर्यंत  मातोश्री आणि ठाकरे आहेत. तो पर्यंत कुठलीही शक्ती शिवसेनेला नमवू शकत नाही. राहीले ते निष्ठावान मावळे,उडाले ते कावळे अशी खरमरीत टीकाही भाजप आणि शिंदे गटावर शनिवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली.

राज्यात नुकत्याच झालेल्या विविध  निवडणुकीत भाजपला जनतेने चांगलाच धडा शिकवला असल्याचेही देसाई यांनी सांगितले.यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील यांनी पुढील जिल्हा परिषदेच्या निवडणूका शिवसेनाच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.तर जिल्ह्यातील शिवसैनिक निष्ठावान आहेत.त्यामुळे रायगडमधील तिन्ही गद्दार आमदारांना शिवसैनिक व जनता येत्या निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवुन देतील असा विश्वास व्यक्त करतानाच यासाठीच विजयाची शिवगर्जना गावोगावी झाली पाहिजे असे आवाहन जिल्हा प्रमुख व माजी मनोहर भोईर यांनी शिवगर्जना अभियान व कार्यकर्ता मेळाव्यात केले. या शिवगर्जना अभियाना अंतर्गत उरण शहरातून मोटार सायकल रॅलीही काढण्यात आलीं होती.

याप्रसंगी जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर,युवा नेते दीपक भोईर,पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर व इतर पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे