शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 12:19 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घालून त्यांचा सत्कार केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

PM Narendra  Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घालून त्यांचा सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही त्यांच्यासोबत उपस्थित होते. प्रफुल्ल  पटेल यांनी मोदींना जिरेटोप घातल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनीही पंतप्रधान मोदींसह महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे. यावर आता भाजपने स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख म्हणून असलेला जिरेटोप घातला. जिरेटोप घातल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी महायुतीला घेरलं आहे. शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच भाजप आणि शिंदे गटाने याबाबत स्पष्टीकरण दिलं.

पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत

"जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे," अशी टीका शरद पवार गटाने केली. तर "छत्रपती शिवाजी महाराज यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही जिरोटोप परिधान करु नये असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यावर जिरेटोप परिधान करण्याची पद्धत आहे. पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत. फक्त छत्रपतीच जिरेटोप परिधान करु शकतात. जिरेटोपाचा असा अपमान केला जाऊ नये," असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.

भाजपने दिलं स्पष्टीकरण

छत्रपतींचा जिरेटोप प्रफुल्ल पटेल यांनी बेईमानांच्या डोक्यावर घातला, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आता भाजप आणि शिंदे गटाने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला यात पंतप्रधानांचा दोष काय?, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तर  जिरेटोपावरुन राजकारण करु नये, ज्यांनी जिरोटोप घातला त्या पंतप्रधानांचा यात काय दोष? अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीprafull patelप्रफुल्ल पटेलEknath Shindeएकनाथ शिंदे