शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

Devendra Fadnavis: हिंदुह्रदयसम्राट ऐवजी शिवसेनेने जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलंय, त्यामुळे...; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 11:09 IST

कुणीही सोबत आलं तरीही महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता मोदींच्या मागे आहे. ती भाजपालाच निवडून देईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

नागपूर – राज्यात MIM चे खासदार इम्तियाज जलील(MIM Imtiaz Jaleel) यांनी केलेल्या विधानावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असं इम्तियाज जलील यांनी सांगत MIM महाविकास आघाडीत यायला तयार आहे. हा निरोप शरद पवारांपर्यंत पोहोचवा अशी विनंती जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना करत शरद पवारांना(Sharad Pawar) ऑफर दिली आहे.

मात्र आता जलील यांच्या ऑफरवरून भाजपाने शिवसेनेला कोडींत पकडलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) म्हणाले की, MIM ने महाविकास आघाडीसोबत जरूर जावं. ते सगळे एकच आहेत. भाजपाला हरवण्यासाठी सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु कुणीही सोबत आलं तरीही महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता मोदींच्या मागे आहे. ती भाजपालाच निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच MIM सोबतच्या आघाडीबाबत शिवसेना काय करते याकडे आमचं लक्ष असेल. निवडणुकीत पराभव झाल्यावर विरोधकांना ईव्हीएममध्ये गोंधळ दिसतो. बी टीम दिसते, सी टीम दिसते. त्यामुळे हरल्यावर अनेक गोष्टी बोलत असतात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आता सत्तेसाठी शिवसेना(Shivsena) काय करते हे दिसून येते. शिवसेनेने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. अजानची स्पर्धा भरवली जाते. त्याचा परिणाम आहे का दिसेल असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.

राजू शेट्टी आमच्यासोबत होते, पण...  

स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा भाजपासोबत येईल अशी चर्चा राज्यात सुरू झाली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राजू शेट्टी हे आमच्यासोबत होते. काही कारणास्तव ते महाविकास आघाडीसोबत गेले. परंतु शेट्टींसोबत अद्याप कुठलीही बैठक झाली नाही. परंतु जो कोणी शेतकरी नेता असेल त्यांनी भाजपा, मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी किती निर्णय घेतले ते पाहिले तर अद्याप इतर कुठल्याही सरकारने ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत ते दिसून येईल असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

MIM शी आघाडी नको – शिवसेना

इम्तियाज जलील यांच्या ऑफरवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,  राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. चौथा, पाचवा कोण असेल याची आतापासूनच चर्चा करण्याची गरज नाही. जे भाजपासोबत छुप्या युतीत काम करत आहेत, त्यांच्याशी महाविकास आघाडीत संबंध येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जे औरंगजेबाला मानतात त्यांचा शिवरायांना मानणाऱ्यांशी कोणताही संबंध येत नाही. एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे. सर्व राज्यांत आपण हे पाहिलेले आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणाऱ्यांसोबत आमची आघाडी कशी होईल, हे तुम्ही कसा विचार करू शकता. त्यांना दूरुनच नमस्कार असं सांगत शिवसेनेने MIM सोबत आघाडी करण्यास नकार दिला आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा