शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना आव्हान; म्हणाले, “राष्ट्रपती राजवट...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 17:09 IST

Maharashtra News: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी काही प्रश्न उपस्थित केलेत.

Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर अद्यापही यावरून राजकीय वर्तुळात चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला या प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अधिक भाष्य केले नव्हते. मात्र, आता यासंदर्भात शरद पवारांनी एक विधान केले आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना आणखी एक आव्हान दिल्याचे सांगितले जात आहे. 

सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय घडले ते तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. राज्यात तेव्हा तसे काही घडले नसते तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का? असे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 

पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना आव्हान

राष्ट्रपती राजवट लावण्यामागे नेमकी कारण काय? हे शरद पवारांनी सांगावे. राष्ट्रपती राजवट का लागली? राष्ट्रपती राजवट कुणाच्या सांगण्यावरुन लागली? त्याच्या पाठीमागे काय होते? याचा खुलासा शरद पवार यांनी करावा, त्यानंतर सर्व कड्या जुळतील अन् तुमच्यासमोर उत्तरे येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता, त्यांनी सांगितले होते की अजित पवार यांनी आपल्यासोबत येऊन शपथ घेतली आहे,  आणि शरद पवार यांना याची कल्पना आहे, ते आपल्या सोबत आहेत. अजित पवार मोठा चेहरा आहे, मात्र राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी अजित पवार यांचा वापर केला असेल असं मग त्यांच्या राजकीय जीवनातील ती चूक आहे किंवा अजित पवार यांच्या बद्दलचा तो भाव आहे. अजित पवार यांनाच का पाठवले त्यांची विश्वसनीयता कमी करायची होती, यांचे राजकीय आयुष्य उध्वस्त करायचे होते, राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते काम करतात, मात्र अजितदादा यांचे महत्व कमी करायची होते का, असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. पहाटेचा शपथविधी ही शरद पवार यांचीच स्क्रीप्ट होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारण नव्या चर्चेला उधाण आले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार