शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवकाच्या खुनाची सुपारी, पक्षाच्या नेत्याचेच कारस्थान : ५० लाखांपैकी १० लाख दिल्याचे तपासात उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:44 IST

डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्यासाठी भाजपाचा ग्रामीणचा पदाधिकारी असलेल्या एका नगरसेवकाने ५० लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांच्या चौकशीतून ही माहिती उघड होताच एकच खळबळ उडाली.

ठाणे : डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्यासाठी भाजपाचा ग्रामीणचा पदाधिकारी असलेल्या एका नगरसेवकाने ५० लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांच्या चौकशीतून ही माहिती उघड होताच एकच खळबळ उडाली.ग्रामीण भागात पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी आणि तेथील आमदारकीचा मार्ग सूकर होण्यासाठी हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच कुणाल यांचे काका वंडार पाटील यांच्या मुलाची काही वर्षांपूर्वी हत्या झाली होती. त्याचा बदला घेण्यावरून कुणाल आणि या हल्लेखोरांत वैमनस्य आहे. त्यातून कुणाल यांचा काटा काढण्याचा कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने तपास सुरू झाला आहे. नाव घेतलेल्या नगरसेवकांचे कॉल रेकॉर्ड तपासले जात आहे.या दरोडेखोरांकडून तीन दरोड्यांचीही उकल झाली असून त्यांच्याकडून तीन लाख ४० हजारांच्या रोकडसह एक रिव्हॉल्व्हर, एक पिस्टल, दोन गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसे आणि दोन मोटारसायकली जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.कुणाल पाटील हे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातील भाजपा पुरस्कृत नगरसेवक आहेत. त्यांना ठार मारण्यासाठी डोंबिवलीत भाजपाचा पदाधिकारी असलेल्या एका नगरसेवकाने सुपारी दिली होती. त्यातील १० लाख रुपये आगाऊ घेतल्याचे या दरोडेखोरांनी कबुलीजबाबात म्हटले आहे. ज्यावेळी कुणाल यांना ठार मारण्यासाठी हे टोळके दबा धरून बसले होते, तेव्हा ते बाहेर न पडल्यामुळे हल्ल्यातून बचावल्याची कबुली त्यांनी दिली.भाजपाच्या पुरस्कृत नगरसेवकाला भाजपाच्याच ज्येष्ठ नगरसेवकाने ठार मारण्याची सुपारी दिल्याचे उघड झाल्याने पक्षाच्या कल्याण-डोंबिवली आणि ग्रामीण भागातील वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरोडयाची चौकशी सुरु असताना ही माहिती उघडकीस आल्याने या संदर्भातील नव्याने गुन्हा दाखल होणार असून त्याची स्वतंत्रपणे चौकशी केली जाणार असल्याचे ठाणे ग्रामीणच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ ला सांगितले.... आणि कट उघड झाला : भिवंडीच्या कुडूस येथील एका दरोड्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांचे पथक करत होते. सीसीटीव्ही तसेच खबºयांच्या आधारे त्यांनी १६ डिसेंबरला भिवंडीतून कैलास घोडविंदे याला अटक केली.त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजू शेट्टी, अलुद्दीन शेख, विजय मेनबन्सी या सहा जणांना अटक झाली. त्यांच्यातील विजय मेनबन्सी याने दिलेल्या माहितीतून कुणाल पाटील यांना ठार मारण्याची सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला.

टॅग्स :Crimeगुन्हा