शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवक्त्यांमुळे भाजपा सातत्याने अडचणीत; राम कदम, मधू चव्हाण, अवधूत वाघ यांच्यामुळे पंचाईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 01:53 IST

सिद्धी माध्यमांमधून पक्षावर होणारी टीका, आरोप आदींना सामोरे जात त्यातून पक्षाची व पक्षातील नेत्यांची पाठराखण करण्याची जबाबदारी प्रवक्त्यांवर असते पण प्रवक्त्यांमुळे पक्षच अडचणीत आल्याचा अनुभव सध्या प्रदेश भाजपाला येत आहे.

मुंबई : प्रसिद्धी माध्यमांमधून पक्षावर होणारी टीका, आरोप आदींना सामोरे जात त्यातून पक्षाची व पक्षातील नेत्यांची पाठराखण करण्याची जबाबदारी प्रवक्त्यांवर असते पण प्रवक्त्यांमुळे पक्षच अडचणीत आल्याचा अनुभव सध्या प्रदेश भाजपाला येत आहे.भाजपाचे एक प्रवक्ते आमदार राम कदम यांनी मुलींविषयी वादग्रस्त विधान करून मध्यंतरी टीका ओढावून घेतली होती. त्यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना साधी कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली नाही. तर दुसरे प्रवक्ते मधु चव्हाण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या ऐन तोंडावर झालेल्या या प्रकाराने खळबळ माजली होती. चव्हाण यांच्यावरदेखील पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. राम कदम आणि चव्हाण यांना कोणत्याही चॅनेलकडून आता प्रवक्ते म्हणून बोलविले जात नाही, अशी परिस्थिती आहे.अन्य एक प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे ११ वे अवतार असल्याचे टिष्ट्वट करून शुक्रवारी वाद ओढावून घेतला. इंदिरा गांधी व राजीव गांधी हे शहीद झाले नव्हते असे विधान त्यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते.भंडारी, उपाध्ये लढवत आहेत किल्लामाधव भंडारी आणि केशव उपाध्ये हे दोन महत्त्वाचे प्रवक्ते शिल्लक आहेत की, ज्यांची जीभ घसरलेली नाही. भंडारी अत्यंत विश्वासाने माध्यमांमध्ये बोलतात. उपाध्ये हे बरीच वर्षे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पीए होते. एक पीए प्रवक्ते म्हणून काय दिवे लावणार, अशी अपप्रसिद्धी स्वत:ला ‘वाघ’ म्हणवून घेणाऱ्यांनी केली होती, पण इतरांपेक्षा उपाध्ये उजवे ठरत आहेत.

टॅग्स :BJPभाजपा