शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकच नसल्याचा भाजपचा दावा, तरी मोदी-शाह यांच्या सभांसाठी जोर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 14:27 IST

विरोधी पक्ष अस्तित्वात नसून शाळकरी मुलांना विचारले तर, तेही सांगतील कोण निवडून येणार एवढा आत्मविश्वास भाजप नेत्यांना आहे. मात्र असं असेल तर मग पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रचारासाठी काय गरज, असा सवाल बार्शी येथील सभेत शरद पवारांनी उपस्थित केला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर भारतीय जनता पक्ष राज्यातील विधानसभा निवडणुकाला सामोरे जाताना फॉर्मात आहे. अर्थात ओपिनियन पोलमधून देखील भाजपसाठी पोषक वातावरण असल्याचे सांगण्यात आले आहे. हाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार विरोधीपक्ष नसल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या सभांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नसल्याच्या भाजपच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वाऱ्याची दिशा पाहून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश मिळविण्यावर भर दिला. यापैकी अनेकांना प्रवेश मिळाला तर काही आहे तिथेच कायम राहिले. विरोधीपक्षाचे नेते आपल्या पक्षात घेतल्याने सत्ताधारी भाजपची ताकत वाढली. याच वाढलेल्या ताकतीच्या जोरावर भाजपने युतीत अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. अर्थात जागा वाढवून घेण्यामागचा मुख्य हेतू  भाजपचा स्पष्ट बहुमत हाच आहे.

मागील पाच वर्षांत अनेक नेते सोडून गेल्यामुळे विरोधीपक्ष कमकुवत बनला आहे. मात्र निवडणुकीची तयारी विरोधी पक्षाने देखील जोरात सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार खुद्द मैदानात उतरले आहे. तर काँग्रेसने पहिल्या यादीत अनेक आश्वासक उमेदवार दिले आहेत. पण सत्ताधाऱ्यांकडून समोर प्रतिस्पर्धीच नसल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी विरोधी पक्षाची धास्ती देखील घेतल्याचे दिसून येते. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या प्रचारसभांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

दरम्यान विरोधी पक्ष अस्तित्वात नसून शाळकरी मुलांना विचारले तर, तेही सांगतील कोण निवडून येणार एवढा आत्मविश्वास भाजप नेत्यांना आहे. मात्र असं असेल तर मग पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रचारासाठी काय गरज, असा सवाल बार्शी येथील सभेत  शरद पवारांनी  उपस्थित केला आहे.