शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

"तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवळं बंद ठेवून भक्तांना कसे आडवे गेलात तुम्ही उद्धवजी?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 12:22 IST

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

दिल्ली सरकारच्या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मनाविरोधात गेला म्हणून  सरकारने तोच निर्णय संसदेत बहुमताच्या आधारे फिरवून दिल्लीवर कब्जा मिळविला. अगदी त्याचप्रमाणे संसदेने बोलाविलेल्या विशेष अधिवेशनात मराठा, धनगरांना आरक्षण मिळवून द्या, असे आव्हान शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. याच दरम्यान भाजपाने पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

"तुम्ही तुमचा आख्खा पक्षच बसवला, बात निकलेगी तो बहोत दूर तक जाएगी उद्धवजी..." असं म्हणत भाजपाने खोचक टोला लगावला आहे. तसेच "तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवळं बंद ठेवून भक्तांना कसे आडवे गेलात तुम्ही उद्धवजी?" असा सवालही विचारला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"राजकीय रंग द्यायचा नाही म्हणता...पण नेमकं तेच करून सामाजिक सलोख्याचा तुम्ही बेरंग करताय उद्धवजी! आरक्षण प्रामाणिकपणे दिले म्हणता... पण न्यायालयीन कसोटीवर ते टिकणार नाही, अशी फट ठेवण्याचा अप्रामाणिकपणा कसा केलात उद्धवजी? तुमच्यावेळी लाठ्या उगारण्याची वेळ आली नाही म्हणता... आंदोलनकर्त्या एसटी कामगारांवर पडल्या, त्या काय होत्या उद्धवजी? सणांच्या दिवसांत अधिवेशन ठेवून आम्ही सणांना आडवं जातो म्हणता... पण मग तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवळं बंद ठेवून भक्तांना कसे आडवे गेलात तुम्ही उद्धवजी?"

"आम्हाला एक फुल- दोन हाफ आणि कारभार शून्य म्हणता... तुम्ही तर अडीच वर्षांत मंत्रालयाची पायरीही चढला नाहीत उद्धवजी! अजूनही स्वत:ची कुवत न ओळखता महाराष्ट्र उभा करतो म्हणता...तुम्ही तर तुमचा आख्खा पक्षच बसवला उद्धवजी! आज शांतीत भेटायला आलोय, असं म्हणता...मग उद्या पेटवण्याची भाषा कशाला उद्धवजी? बात निकलेगी तो बहोत दूर तक जाएगी उद्धवजी...!" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChitra Waghचित्रा वाघPoliticsराजकारण