शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Chitra Wagh : "काल काही फुटले, आज १३ झाले, यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात"; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 12:31 IST

BJP Chitra Wagh Slams Shivsena : एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. तर, गुजरातमध्ये शिंदेंसोबत २५ आमदारांचा गट असल्याची सुत्रांची माहिती आहे. याच दरम्यान भाजपाने खोचक टोला लगावला आहे. 

मुंबई - विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले. मात्र या विजयानंतर सचिन आहिर वगळता शिवसेनेच्या एकही बड्या नेत्याने माध्यमांशी संवाद साधला नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच अलिप्त असल्याचं सोमवारी दिवसभरात दिसून आलं. आता एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. तर, गुजरातमध्ये शिंदेंसोबत २५ आमदारांचा गट असल्याची सुत्रांची माहिती आहे. याच दरम्यान भाजपाने खोचक टोला लगावला आहे. 

"काल काही फुटले, आज १३ झाले" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "काल काही फुटले, आज १३ झाले. यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात…" असं वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. "जय हो...विजय हो देवेंद्र फडणवीसजी" असं देखील त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये "पैलवान तेल लावून आले होते पण खेळ बुद्धिबळाचा होता" असं म्हटलं आहे. शिवसेनेच्या १० ते १२ आमदारांचा गट रात्री १० वाजता सूरतला पोहोचला आहे. तर, मंत्री एकनाथ शिंदेंसह इतर आमदार सूरतला पोहोचले असून एकूण २५ आमदारांचा गट गुजरातच्या सूरतमध्ये असल्याचे समजते. विशेष म्हणजे गुजरात भाजपकडून या आमदारांना सहकार्य आणि मदत करण्यात येत आहे.

गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील हेही काल रात्रीच सुरतला पोहोचले होते. विशेष म्हणजे गांधीनगरमधील त्यांच्या नियोजित कार्यक्रमात बदल करून ते सुरतला पोहोचले असून सुरत हा पाटील यांचाच गड आहे. मात्र, अद्याप त्यांची शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यासोबत बैठक किंवा चर्चा झाली नाही. दरम्यान, शिवसेनेत मतभेद असल्याचं गुजरातमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटल्याची माहिती आहे.

राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. मात्र, भाजपाने विजय खेचून आणल सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे, महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. त्यातच, शिवसेना नेते एकनाथ शिंदे अचानक गुजरातला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्षही आपला नियोजित कार्यक्रम सोडून रात्रीच सूरतला पोहचले होते.  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण