शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उदय सामंत-राज ठाकरे भेट, भाजपा नेत्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते सर्वांचे मित्र...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:57 IST

BJP Chandrashekhar Bawankule News: उदय सामंत यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

BJP Chandrashekhar Bawankule News: बीड, परभणी मुद्द्यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून,  महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे नेत्यांच्या गाठी-भेटी वाढताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, चर्चांना सुरुवात झाली आहे. 

आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पुन्हा महायुती नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढली आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज यांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले होते. यानंतर आता शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. पुण्यात मराठी भाषिकांच्या संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती राज ठाकरेंना केली होती. त्या विनंतीला मान देऊन त्यांनी संमेलनाला हजेरी लावली. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतली. मराठी भाषेबाबत आमच्यात चर्चा झाली. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू आहे त्याबद्दल चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीला राजकीय स्पर्श करू नये. ही अतिशय साधी आणि सहज भेट होती, असे उदय सामंत यांनी सांगितले. यावर भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

राज ठाकरे यांचे सर्वांची चांगले संबंध आहेत

पत्रकारांशी संवाद साधत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांना उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर, राज ठाकरे यांचे सर्वांची चांगले संबंध आहेत. ते सर्वांचे मित्र आहे. त्यामुळे अशा किती होत असतात, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक गोष्ट ही राजकारणाच्या चष्म्यातून बघितली पाहिजे असे नाही, काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडे असतात. ही फक्त सदिच्छा भेट होती. एकमेकांच्या घरी जाऊन आपण लोकांना भेटतो, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, त्याचप्रमाणे ही भेट झाली, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणाची शैली आणि त्यांचे वकृत्व वेगळे आहे. राज ठाकरे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासोबत राजकारणापलीकडे जाऊन गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे ही भेट राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्रित युतीमध्ये येणार का हे माझ्यासाठी फार मोठा विषय आहे. एवढ्या पातळीवरील चर्चेत मी कधी पडलो नाही. माझ्या आवाक्यातील आणि झेपतील असे प्रश्न असतील तर मी त्याला उत्तर देऊ शकतो. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली पाहिजे, असे उदय सामंत यांनी नमूद केले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUday Samantउदय सामंतChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे