शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा विजयरथ काँग्रेस रोखू शकेल का?

By admin | Updated: February 18, 2017 02:04 IST

महापालिकेतील भाजपच्या सत्तेला दोन टर्म म्हणजे दशक पूर्ण झाले आहेत. ‘हॅट्रीक’ मारण्यासाठी भाजप सज्ज झाली असून दुसरीकडे दहा

कमलेश वानखेडे / नागपूर महापालिकेतील भाजपच्या सत्तेला दोन टर्म म्हणजे दशक पूर्ण झाले आहेत. ‘हॅट्रीक’ मारण्यासाठी भाजप सज्ज झाली असून दुसरीकडे दहा वर्षांच्या वनवासानंतरही काँग्रेस नेत्यांनी धडा घेतलेला नाही. भाजपविरोधात एकजुटीने लढा देण्याऐवजी गटातटाच्या वादात एकमेकांचे उमेदवार ‘रन राऊट’ करण्यातच धन्यता मानत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरकरांपुुढे विकासाचा पाढा वाचत असताना, दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्यावरील शाईफेक प्रकारामुळे गटबाजी प्रकर्षाने चव्हाट्यावर आली आहे. स्वबळावर लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-सेना एकत्र लढली. या वेळी भाजपने स्वबळाचा नारा देत ‘मिशन १२५’ गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर शिवसेनेने भाजपमधील काही असंतुष्टांच्या हाती धनुष्यबाण सोपवून कमळावर निशाना साधला आहे. गेल्यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी असतानाही काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. या वेळी आघाडी तुटताच राष्ट्रवादीने भाजपा व काँग्रेसच्या असंतुष्टांना हाताशी धरून घड्याला चाबी भरली. रिपब्लिकन फ्रंट, मुस्लीम लिग आदी पक्षांना सोबत घेत महायुती केली. काँग्रेसने लोकमंच व डॉ. राजेंद्र गवई यांच्याशिवाय कुणाशीही हात मिळविलेला नाही. राष्ट्रवादीचे टार्गेट काँग्रेस तर शिवसेनेचे लक्ष्य भाजप आहे. राष्ट्रवादी बऱ्यापैकी प्रभाव टाकत असून शिवसेनेला मात्र मातोश्रीवरून पाहिजे तशी रसद पुरविली जात नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत तोफ गर्जना करीत असताना खा. संजय राऊत यांना एक दिवसाच्या नागपूर मुक्कामी पाठवून शिवसेना निश्चिंत झाली. खरे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात येऊन शिवसैनिकाचा ‘आवाज’ बुलंद करणे आवश्यक होते. तिकीट वाटपात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विद्यमान नगरसेवकांना धक्का दिला. भाजपने तब्बल २४ तर काँग्रेसने १० नगरसेवकांचे तिकीट कापले. पाठोपाठ बसपाने चार नगरसेवकांना हत्तीवरून उतरविले. तिकीट कटल्यामुळे सर्वच पक्षात मोठी बंडाळी झाली. शिस्तप्रिय संघ परिवाराशी संबंधित असलेल्या उमेदवारांनी काही जागांवर भाजपा विरोधात दंड थोपटल्याचे चित्र आहे. भाजप नेते डॅमेज कंट्रोलसाठी कसोसीने प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस नेत्यांनी आधी एकमेकांच्या समर्थकांचे तिकीट कापण्यासाठी व आता उमेदवार आपटण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांचे फोटो तर काँग्रेस उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या अपक्ष उमेदवारांच्या बॅनर, होर्डिंग्जवर झळकत आहेत.