शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

राज्य तोडण्याचा भाजपचा डाव

By admin | Updated: October 11, 2014 00:26 IST

अजित पवार : सत्ता मिळविण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी; आर. के. पोवार यांच्या प्रचारार्थ सभा

कोल्हापूर : विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र हा गुजरातपेक्षा कितीतरी पटींनी पुढे असताना केवळ सत्ता मिळविण्यासाठी राज्याची बदनामी करणाऱ्या व राज्य तोडण्याचा डाव आखणाऱ्या भाजपला मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, शुक्रवारी रात्री येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना केले. पवार काका-पुतण्यांना उभा महाराष्ट्र ओळखतो; त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी ओळख करून देण्याची गरज नाही, अशा शब्दांत पवार यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.कोल्हापुरातील पापाची तिकटी चौकात कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आर. के. पोवार यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली होती. विरोधी पक्षांनी निवडणुकीत जरूर मते मागावीत, लोकांसमोर आपली भूमिका मांडावी; परंतु राज्याची बदनामी करून मते मागण्याचा कोणाला अधिकार नाही. गेल्या पंधरा दिवसांत महाराष्ट्राची जाहिरातींच्या माध्यमातून भाजपवाल्यांनी प्रचंड बदनामी केली. नळाला पाणी येण्याऐवजी हवाच येते, असे एका जाहिरातीत दाखविले; परंतु नळाला पाणी येण्याऐवजी आधी हवाच येते आणि मग पाणी येते, हेच यांना कळत नाही. एका जाहिरातीत वाकड्या तोंडाचा शेतकरी दाखवून तमाम शेतकऱ्यांचाही अपमान केला, असे पवार म्हणाले.एकीकडे जनता बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी मागणी करीत असताना भाजपचे राज्यातील नेते स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन जनतेला देत आहेत. यांना राज्य तोडण्याचा अधिकार कोणी दिला, याचा जाब जनतेने विचारण्याची आवश्यकता आहे, असे सांगून पवार म्हणाले की, लोकसभेला जी आश्वासने दिली ती गेल्या सहा महिन्यांत पाळली नाहीत. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपला प्रभू रामचंद्राची आठवण यायची. हिंदुत्वाची आठवण यायची; पण आता हे रामाला विसरले. आता यांना शिवाजी महाराजांची आठवण आली. उद्या निवडणुका संपल्यावर त्यांनाही विसरतील. चीनची घुसखोरी सुरू आहे. पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. परंतु तिकडे लक्ष देण्याऐवजी मोदी हे केवळ महाराष्ट्रातील निवडणुकीत अडकून पडले आहेत. त्यांचा महाराष्ट्राकडील ओढा कमी होत नाही, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीला ताकद द्या : धनंजय महाडिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, आमदारांनी शेकडो कोटींचा निधी कोल्हापूरच्या विकासासाठी आणला आहे. अशाच प्रकारचे काम कोल्हापूर उत्तरमध्येही होण्यासाठी आर. के. पोवार यांना तसेच राष्ट्रवादीला ताकद द्या, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केले. एक रस्ता केल्याचे दाखवा : लाटकर शहराच्या आमदारांनी एक रस्ता चांगला केल्याचे दाखवावे, आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देतो. शहरात कोणती विकासकामे केली हे बिंदू चौकात येऊन सांगा, असे आव्हान नगरसेवक राजू लाटकर यांनी यावेळी दिले. आमदारांनी उठसूट ‘कोल्हापूर बंद’ केले. ठेकेदारांनी दमबाजी केली, असेही लाटकर म्हणाले. फक्त दमबाजीच : पोवार स्थानिक आमदारांनी पोलिसांना, अधिकाऱ्यांना नुसती दमबाजीच केली. कोल्हापूर चौदावेळा बंद पाडले. गेल्या पाच वर्षांत हेच काम त्यांच्याकडून झाले, असे आर. के. पोवार म्हणाले.