शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारकडे मंत्र्यांवर उधळण्यासाठी पैसे आहेत; जनता उपाशी अन् मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:47 IST

BJP Atul Bhatkhalkar And Maharashtra Government : कोरोनाचा संसर्ग झालेल्या या मंत्र्यांपैकी १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र या मंत्र्यांवरील उपचारांसाठी झालेला खर्च मात्र सरकारी तिजोरीतून वसूल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाकाळात राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनाचा संसर्ग झालेल्या या मंत्र्यांपैकी १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र या मंत्र्यांवरील उपचारांसाठी झालेला खर्च मात्र सरकारी तिजोरीतून वसूल करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. या १८ मंत्र्यांवरील उपचारांसाठी झालेल्या बिलाचा एकूण १ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च सरकारी तिजोरीतून करण्यात आला असून, त्यात सर्वाधिक ३४ लाख ४० हजार रुपये खर्च हा आरोग्यमंत्री राजेश टोपेंवरील उपचारांसाठी झाला आहे. यावरून आता भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"सरकारकडे फक्त मंत्र्यांवर उधळण्यासाठी पैसे आहेत. जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?" असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "जनतेला सरकारी हॉस्पिटलसाठीही रखडावं लागत होतं त्या कोरोना काळात मंत्री जनतेचा पैसा वापरून पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सरकारकडे फक्त मंत्र्यांवर उधळण्यासाठी पैसे आहेत. जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?" असं म्हणत भातखळकर यांनी खोचक सवाल विचारला आहे. 

राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सराकरमधील अनेक प्रमुख मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर उपचारांसाठी मंत्रिमहोदयांकडून सरकारी रुग्णालयांऐवजी खासगी रुग्णालयांनाच प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर या उपचारांच्या बिलांचा खर्च या मंत्र्यांनी सरकारी तिजोरीतून वसूल केला. या मंत्र्यांमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रिफ, छगन भुजबळ, सुभाष देसाई, अनिल परब, जयंत पाटील यांचा समावेश आहे. 

खासगी रुग्णालयातून उपचार घेणारे मंत्री आणि त्यांच्यावर झालेला खर्च पुढीस प्रमाणे आहे. 

राजेश टोपे - ३४ लाख ४० हजार नितीन राऊत - १७ लाख ६३ हजार हसन मुश्रिफ - १४ लाख ५६ हजार अब्दुल सत्तार - १२ लाख ५६ हजार जितेंद्र आव्हाड - ११ लाख ७६ हजार छगन भुजबळ - ९ लाख ३ हजार सुनील केदार - ८ लाख ७१ हजार जयंत पाटील - ७ लाख ३० हजार सुभाष देसाई - ६ लाख ९७ हजार अनिल परब - ६ लाख ७९ हजार दरम्यान, कोरोनाबाधित मंत्र्यांनी उपचारांसाठी खासगी रुग्णालयांना प्राधान्य देऊन त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून वसूल केल्याने आता राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरRajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा