शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजप-सेना युतीने उडविला आघाडीचा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:44 IST

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी तब्बल ४१ जागा जिंकून भाजप-शिवसेना युतीने घवघवीत यश मिळविले.

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी तब्बल ४१ जागा जिंकून भाजप-शिवसेना युतीने घवघवीत यश मिळविले. आजवरच्या इतिहासात काँग्रेसचा सर्वात दारूण पराभव झाला असून पक्षाच्या वाट्याला केवळ एक जागा आली. तर राष्ट्रवादी काँग्रेस ४, युवा स्वाभिमानी पक्षाने १ आणि एमआयएमने १ जागा जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा हा विजय आम्ही विधानसभेतही पुढे नेऊ, असा विश्वास युतीच्या विजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाला.माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी ५० हजारावर मतांनी पराभूत केले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडून सोलापुरात दारुण पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या दिग्गज पराभुतांमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचा समावेश आहे. मात्र शिवसेनेतून ऐनवेळी काँग्रेसमध्ये गेलेले सुरेश (बाळू) धानोरकर यांनी चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे हंसराज अहीर यांना पराजित करून काँग्रेसचे खाते उघडले.शिवसेनेने १८ जागा जिंकल्या तरी पाच ठिकाणी पराभवाचे मोठे धक्के बसले. त्यात चार विद्यमान खासदारांचा समावेश आहे. रायगडमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा राष्टÑवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांनी पराभव करीत गेल्यावेळच्या पराभवाचे उट्टे काढले.औरंगाबादमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला. अमरावतीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचा राष्टÑवादी समर्थित युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत राणा यांनी दारुण पराभव केला. तर शिरुरमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळराव पाटील यांचा राष्टÑवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे (अभिनेते) यांना पराभव करून अनेकांचा आश्चर्याचा धक्का दिला. राष्टÑवादीचे उदयनराजे भोसले यांच्यामुळे गाजलेल्या सातारा मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा पराभव झाला.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घराण्याच्या वाट्याला पहिल्यांदाच पराभव आला आहे.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभूत झाले. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखत जबरदस्त विजय मिळविला. बारामती आणि चंद्रपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला असे दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्टÑवादीच्या पराभवास कारणीभूत ठरली.>राज्याचे चित्र असेपक्ष २०१९ २०१४ -/+Ñभाजपा २३ २३ ००शिवसेना १८ १८ ००राष्ट्रवादी ०४ ०४ ००क ाँग्रेस ०१ ०२ -१इतर ०२ ०१ +१

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019