शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त भिलारमध्ये 'स्मरण विंदांचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 18:09 IST

विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून पुस्तकांच्या गावात (भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) ‘स्मरण विंदांचे’ हा कार्यक्रम शनिवार, दि. १६ सप्टेंबर, २०१७ रोजी योजण्यात आला आहे,

मुंबई दि. ८ -   ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून पुस्तकांच्या गावात (भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) ‘स्मरण विंदांचे’ हा कार्यक्रम शनिवार, दि. १६ सप्टेंबर, २०१७ रोजी योजण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री  विनोद तावडे यांनी आज दिली.‘भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव’ म्हणून संपूर्ण देशाने गौरवलेल्या महाराष्ट्र शासनाच्या या अभिनव प्रकल्पात आता साहित्यिक जाणिवा समृद्ध करणाऱ्या कार्यक्रमांची सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात वाचनसंस्कृतीचं सुरु झालेलं हे नवं पर्व पुढील टप्प्यासाठी सज्ज आहे. सन २०१७-१८ हे वर्ष कविवर्य विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.  या निमित्ताने, मराठी साहित्याचा मानबिंदू असलेल्या विंदांना अभिवादन करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांच्या गावी ‘स्मरण विंदांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे विनोद तावडे म्हणाले.

परिसंवाद, कविसंमेलन व अभिवाचन असे या कार्यक्रमाचे स्वरुप असून सकाळी ९.०० ते सायं. ५.०० या वेळेत ४ सत्रांत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. डॉ. अरुणा ढेरे, अभिराम भडकमकर, प्रदीप निफाडकर, ऐश्वर्य पाटेकर, डॉ. अविनाश सप्रे, श्रीधर नांदेडकर, सौरभ गोखले, संगीता बर्वे, प्रमिती नरके आदी मान्यवर साहित्यिक, कलाकार व अभ्यासक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच कविवर्य विंदा करंदीकरांच्या परिवारातील श्रीमती जयश्री काळे, आनंद करंदीकर आदी सदस्यही कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

‘स्मरण विंदांचे’ या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि पुस्तकांच्या गावाचा अनुभव घेण्यासाठी वाचक-रसिकांनी शनिवार, दि. १६ सप्टेंबर, २०१७ रोजी पुस्तकांच्या गावाला (भिलारला) आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही विनोद तावडे यांनी केले. इच्छुक सहभागींना pustakanchgaav.rmvs@gmail.com या ई-पत्त्यावर आपली नावनोंदणी करावी लागणार आहे.