शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

औटीवाडीच्या तलावात भरली पक्ष्यांची शाळा

By admin | Updated: February 26, 2017 17:17 IST

श्रीगोंदा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या औटीवाडी तलावावर परदेशी पाहुणा असलेल्या ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचे आगमन झाले आहे

बाळासाहेब काकडे/ऑनलाइन लोकमतश्रीगोंदा (अहमदनगर), दि. 26 -  शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या औटीवाडी तलावावर परदेशी पाहुणा असलेल्या ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचे आगमन झाले आहे. प्रेमाचे प्रतीक असलेला हा पक्षी गुलाबी रंगाची उधळण करून पर्यटकांना वेगळीच भुरळ घालत आहे. या परदेशी पाहुण्याबरोबर अनेक जलचर पक्ष्यांची या तलावावर सध्याची शाळा भरल्याचे चित्र आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांत औटीवाडी तलावात पाणी नव्हते. त्यामुळे परदेशी पाहुण्याने औटीवाडी तलावाकडे पाठ फिरवली होती. पण गेली वर्षी पाऊस मुबलक झाला. कुकडीचे पाणी आले अन् औटीवाडीचा छोटा जलाशय तुडुंब भरला. त्यामुळे जलचर प्राणी व पक्ष्यांसाठी औटीवाडीचा तलाव पक्ष्यांना नंदनवन ठरले आहे. श्रीगोंदा शहराच्या आसपास बुलबुल, विविध प्रकारचे बगळे, नाना प्रकारच्या घारी, पोपट, चिमणी, कावळे, शिंपी, वटवट्या, तांबट, मैना, दयाळ, कोतवाल (रामोशी, कोळशा), सातभाई, पाणकावळे, धनेश, भारद्वाज, साळुंखी, पिंगळे, हुप्पो, कोकीळ इत्यादी स्थानिक पक्षी वर्षभर नेहमी आढळतात. वर्षा ऋतू संपून शरद ऋतूला प्रारंभ झाला, की श्रीलंका, भुतान, बांगलादेश, म्यानमार, तिबेट, मालदीव, पाकिस्तान या प्रांतांतून उजनी जलाशयाकडे विदेशी पक्षी येत असतात. जाण्या-येण्याच्या प्रवासात काही दिवसांच्या विश्रांतीसाठी मार्गावरील तलावावर मुक्काम ठोकतात. या पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो हा पक्षी आकर्षण ठरतो.औटीवाडीच्या तलावावर फ्लेमिंगो करकोचा, पानकोंबडे, विविध जातीचे बगळे, पाणलव्हा, घारी, गिधाडे आदी पक्ष्यांची शाळा भरली असून, औटीवाडी तलावातील पक्वान्नांची चव चाखण्यासाठी स्पर्धा लागली आहे. औटीवाडी तलावाच्या परिसरातील गहू, ज्वारी, हरभरा, हिरव्या मिरच्या, मका आणि फळे इतर पक्ष्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे हवेत पाण्यात विहार करणाऱ्या मित्रांची चांगलीच चंगळ आहे. काही पक्ष्यांनी औटीवाडी तलावाशेजारील जंगलातील झाडांवर वर्षभरासाठी खोपे, घरटी विनण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे परिसरात पक्ष्यांची वसाहत तयार होणार आहे . (तालुका प्रतिनिधी)  वाळूउपसा डोकेदुखी औटीवाडी तलावावर रात्रीच्या वेळी बेकायदेशीर बेसुमार वाळूउपसा केला जात आहे. वाळूउपसा करण्याऱ्या मशिनरीचा आवाज हा पक्ष्यांची डोकेदुखी ठरत आहे. वाळूउपशाचे चित्र असेच राहिले, तर पक्षी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करतील आणि औटीवाडी तलावातील पक्ष्यांची शाळा बंद पडण्याचा धोका आहे. याकडे पर्यावरणप्रेमींनी लक्ष देण्याची गरज आहे.