शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

व्हॅट भरा अन् सवलती मिळवा; अभय योजनेचे विधेयक विधिमंडळात मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 07:40 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची माहिती दिली. १० हजार रुपयांपर्यंतची व्हॅटची थकबाकी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. त्याचा फायदा एक लाख प्रकरणांना होईल. 

मुंबई : दीड लाख कोटी रुपयांची मूल्यवर्धित कराची (व्हॅट) थकबाकी राज्यातील उद्योजक, व्यावसायिकांवर असताना त्यातील किमान काही वसुली व्हावी, यासाठी राज्य सरकारने अभय योजना आणली आहे. या विधेयकास सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान थकबाकीची रक्कम भरल्यास व्हॅटमध्ये घसघशीत सवलती मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची माहिती दिली. १० हजार रुपयांपर्यंतची व्हॅटची थकबाकी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. त्याचा फायदा एक लाख प्रकरणांना होईल. व्हॅट थकबाकीच्या १ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी १ लाख ४५ हजार कोटी रुपयांची थकबाकी ही १० लाख रुपयांहून अधिकच्या थकबाकीदारांकडे आहे. १० हजार रुपयांपर्यंतचे एक लाख थकबाकीदार आहेत. १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतचे २.५० लाख, तर १० लाख रुपयांवरील ७५ हजार आहेत.अशी आहे माफी योजना१० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असेल तर २० टक्के रक्कम भरल्यानंतर ८०% थकबाकी माफ हाेईल. १० लाखांपेक्षा अधिकची थकबाकी असेल तर २००५ पूर्वीची आणि २००५ ते २०१७ पर्यंतची थकबाकी असे दोन भाग करण्यात आले आहेत. थकबाकी २००५ पूर्वीची असेल तर अविवादित कर १०० टक्के भरावा लागेल. विवादित कराची ३० टक्के रक्कम भरावी लागेल. तर व्याजाची १० टक्के व दंडाची पाच टक्केच रक्कम भरावी लागेल. अन्य थकबाकी माफ होईल. २००५ ते २०१७ दरम्यानची थकबाकी असेल तर अविवादित कराची १०० टक्के रक्कम भरावी लागेल. विवादित कराची ५० टक्के, व्याजाची १५ टक्के तर  दंडाची पाच टक्के रक्कम भरावी लागेल. अन्य थकबाकी माफ होईल.