शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
8
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
9
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
10
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
11
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
12
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
13
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
14
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
15
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
16
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
17
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
18
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
19
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...

डान्सबार बंदीसाठी विधेयक : मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा

By admin | Updated: March 12, 2016 04:19 IST

डान्सबार बंदीसाठी चालू अधिवेशनातच नवीन विधेयक मांडण्यात येईल. सदर विधेयकाचा मसुदा तयार असून, तो अधिक परिपूर्ण बनविण्यासाठी दोन्ही सभागृहांतील सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येईल

मुंबई : डान्सबार बंदीसाठी चालू अधिवेशनातच नवीन विधेयक मांडण्यात येईल. सदर विधेयकाचा मसुदा तयार असून, तो अधिक परिपूर्ण बनविण्यासाठी दोन्ही सभागृहांतील सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह हेमंत टकले, नरेंद्र पाटील, संजय दत्त, प्रकाश गजभिये यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, मागील सरकारने दोनवेळा डान्सबार बंदी कायदा केला; पण त्यामधील त्रुटीचा फायदा घेऊन न्यायालयात आव्हान देण्यात आले. आता ही लढाई भावनिक राहिली नसून कायद्याची बनली आहे. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून कायदा बनवावा लागेल. राज्यात डान्सबार बंदी असावी, अशीच सरकारची इच्छा आहे. डान्सबारच्या नावाखाली अश्लील नृत्य तसेच महिला व युवकांचे शोषण होऊ नये, यासाठी एक प्रभावी कायदा करण्याची कार्यवाही सुरू आहे. गृह विभागाने विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. न्यायालयाच्या कसोटीवरही डान्सबार बंदी टिकावी यासाठी सदर विधेयकाचा मसुदा परिपूर्ण बनवावा लागेल. दोन्ही सभागृहांतील सदस्यांची एक समिती नेमून मसुदा समितीकडे पाठविला जाईल. त्यावर तीन ते पाच दिवसांत सदस्यांनी सुधारणा सुचवाव्यात आणि परामर्श घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. डान्सबारमुळे अनेक घरे उद्ध्वस्त होत असल्यानेच तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदीचे विधेयक आणले. त्याला आम्ही पाठिंबा दिला. मात्र, न्यायालयाने बंदी अवैध ठरविली. तेंव्हा पुन्हा एकदा कायदा बनविण्यात आला. महाधिवक्तांनी कायद्याच्या मसुद्याबाबत वेगळी भूमिका घेतली असतानाही पुन्हा एकदा एकमताने सभागृहाने डान्सबार बंदीचा कायदा संमत केला. आबांच्या हेतूबद्दल आम्हाला शंका नव्हती. त्यामुळे आमच्या हेतूबद्दलही शंका नको. हे विधेयक एकमताने संमत करणे हीच आबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी करताच दोन्ही बाजूच्या सदस्यांनी बाके वाजवून पाठिंबा जाहीर केला. (प्रतिनिधी)