शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-सर्वात मोठी बातमी : लोकदैवत दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 17:51 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज बुधवारपासून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील देवता कोल्हापुरची अंबाबाई व दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिर अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. श्री जोतिबाची चैत्र यात्राही स्थगित करण्यात आली आहे. तसेच सर्व धर्मांच्या सामुहिक प्रार्थनांवर प्रतिबंध करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केला.

ठळक मुद्देजोतिबा यात्रा स्थगित सर्व सधर्मांच्या सामुहिक प्रार्थनांवरही प्रतिबंध

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज बुधवारपासून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील देवता कोल्हापुरची अंबाबाई व दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिर अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. श्री जोतिबाची चैत्र यात्राही स्थगित करण्यात आली आहे. तसेच सर्व धर्मांच्या सामुहिक प्रार्थनांवर प्रतिबंध करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केला.महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधीक रुग्ण आढळून आले आहेत. दुसऱ्या टप्यातच याचा संसर्ग रोखण्यासाठी बुधवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्मिय व देवस्थान प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, यांच्यासह सर्व पक्षांचे आणि सर्वधर्मीय उपस्थित होते. या बैठकीत सर्वच धार्मिक प्रार्थनास्थळांवर न जाण्याचे प्रशासनाने आवाहन केले, त्याला सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली आहे.वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. हे देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि.मी.वर आहे. या डोंगरावर प्राचीन काळापूसन प्रसिद्ध असलेले हे जोतिबाचे पुरातन मंदीर आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीतील जोतिबाचे दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यानंतर कोरोनाचा पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर