शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेत मोठी चलबिचल, नाशिकमधील १० ते १२ बडे नेते नाराज; सुधाकर बडगुजर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:51 IST

Thackeray Group Sudhakar Badgujar News: प्रयत्नांची पराकाष्ठा करून खासदार निवडून आणला. संघटनात्मक बाजू मजबूत होती, म्हणून विजय मिळाला. परंतु, मध्यंतरीच्या काळात संघटनात्मक बदल झाले तेव्हापासून अनेक जण नाराज आहेत, असे बडगुजर यांनी सांगितले.

Thackeray Group Sudhakar Badgujar News: संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराजी आहे. आता मी स्पष्ट बोलू शकत नाही. संघटनात्मक बदल झाले तेव्हापासूनच नाराजी पसरली आहे. माझी नाराजी कोणावर नाही, मी स्वतःवरच नाराज आहे. संघटनात्मक बदल झाल्यानंतर नाराजीनाट्य चालू झालेले आहे. संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचे वातावरण तयार झाले. त्यामुळेच अनेक जण नाराज झालेले आहेत, असे ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी स्पष्टपणे सांगितले.

पत्रकारांशी बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला आले होते. म्युनिसिपल कामगार सेनेचा अध्यक्ष आहे. २७०० कर्मचारी त्या युनियनचे सभासद आहेत. त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. प्रमुख तीन मागण्या होत्या. पहिली मागणी महापालिकेच्या आस्थापनावर ३६०९ जागा रिक्त आहेत, त्या त्वरित भराव्यात. दुसरी मागणी क्लास थ्री आणि क्लास फोरचे प्रमोशन रखडले आहे. प्रमोशनचा प्रश्न लवकर सोडवावा. तिसरी मागणी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना लवकर मिळावा, याबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती बडगुजर यांनी दिली.

विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण नाराज आहेत

संघटनात्मक बदल मध्यंतरीच्या काळात झाले, तेव्हापासून महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा नेते नाराज आहेत. वरिष्ठांपर्यंत त्या भावना गेलेल्या आहेत. स्थानिक नेत्यांना याबाबत माहिती आहे. राजाभाऊ जेव्हा खासदार झाले, तेव्हा मी असेन किंवा विलास शिंदे असेल, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजय खेचून आणला. संघटनात्मक बाजू मजबूत होती, म्हणून तो विजय मिळवता आला. किंबहुना विधानसभेत आम्हाला अपयश आले. विधानसभेतील अपयशानंतर स्वतःहून म्हटले होते की, जिल्हाप्रमुख पदावरून मला बाजूला करा. मी काम करू इच्छित नाही. माझ्या जागी कोणाची तरी नियुक्ती करावी, अशी मी मागणी केली होती. त्यानुसार माझी मागणी मान्य झाली, असे सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

दरम्यान, नाराजीचा सूर आजपर्यंत कायम आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहोत, असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावरून बरेच तर्क-वितर्क लढवण्यात आले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNashikनाशिकPoliticsराजकारण