शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून आमच्या नात्याला तडा गेला; सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 16:37 IST

सुषमा अंधारे यांना नेताच करायचा होता पण त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य नव्हता असं पूर्वाश्रमीच्या पतीने म्हटलं.

ठाणे - शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धडाडीचे नेतृत्व असून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका असल्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. माझी राजकीय पार्श्वभूमी नाही पण सामाजिक कार्य करत आलोय. आमचे नेते एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती पार पाडू असं विधान वकील वैजनाथ वाघमारे यांनी केले आहे. 

त्याचसोबत सुषमा अंधारे यांच्यासोबतच्या नात्यावर वाघमारेंनी खुलासा केला. ते म्हणाले की, सुषमा अंधारे आणि माझ्यात मतमतांतरे आहेत. गेल्या ५ वर्षापासून आम्ही वेगळे राहतोय. सुषमा अंधारे यांच्याशी राजकीय किंवा सामाजिक विषयावर कुठल्याही प्रकारे संवाद नाही. अंधारे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्यात दुरावा आला. राष्ट्रवादीत भाडोत्री वाहन म्हणून त्या गेल्या. त्यानंतर आमच्या खऱ्या नात्याला तडा गेला. तेव्हापासून आमच्यात मतभेद झाले असं त्यांनी म्हटलं. 

तसेच सुषमा अंधारे यांना नेताच करायचा होता पण त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य नव्हता. सुषमा अंधारे या तोफ वैगेरे काही नाही. त्या कुठून आल्या, कशा आल्या त्याबाबत सविस्तार खुलासा करणार आहे. वेळ पडली तर सुषमा अंधारे यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची भूमिका माझी आहे. माझे नेते एकनाथ शिंदे जे काही आदेश देतील त्याप्रकारे पक्षाचं काम चांदा ते बांदा करणार आहे असंही वैजनाथ वाघमारे यांनी म्हटलं. 

कोण आहेत सुषमा अंधारे? आंबेडकरी चळवळीतल्या वक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांची ओळख होती. त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या. अलीकडेच शिवसेनेतून एकामागोमाग एक नेते पक्ष सोडून जात असताना सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन हाती बांधले. त्यात संजय राऊतांसारखा आक्रमक नेता पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत गेला. राऊत यांच्या तुरुंगवारीत ठाकरेंची बाजू सडेतोड आणि आक्रमक शैलीत मांडून सुषमा अंधारे या शिवसेनेत फायरब्रँड नेत्या बनल्या. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने ठाकरेंनीही प्रत्येक ठिकाणी सुषमा अंधारे यांना भाषणाची संधी दिली. अंधारे यांनी पंतप्रधानांपासून भाजपा नेते आणि शिंदे गटातील ४० आमदारांवर वेळोवेळी बोचऱ्या शब्दात घणाघात केला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सुषमा अंधारे प्रसिद्धीझोतात आल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना