शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मोठा खुलासा! रायगडमध्ये सापडलेली 'ती' संशयास्पद बोट कुणाची?; ओमान कनेक्शन उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 14:53 IST

पोलिसांनी तात्काळ या बोटीबाबत नौदल गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली. ऑन रेकॉर्ड ही बोट यूकेची असल्याचं आढळलं.

रायगड - विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यातच रायगडमध्ये २ संशयास्पद बोटी आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. गोकुळाष्टमी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे हत्यारांचा साठा असलेली बोट सापडल्याने यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. श्रीवर्धनच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी ही बोट आढळली. त्याबाबत प्राथमिक चौकशीत या बोटीचं ओमान कनेक्शन उघड झालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट यूकेत रजिस्टर्ड आहे. यूकेतील एका कंपनीच्या नावावर ही बोट आहे. त्याची पडताळणी पोलिसांनी केली आहे. त्याचसोबत २ व्यक्तींबाबत पोलिसांना कळालं आहे. त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती सापडले आहेत. या दोन्ही व्यक्ती इंडोनेशियाच्या नागरिक असल्याचं पुढे आलं आहे. तसेच एका ऑस्टेलियन नागरिकाबाबतही काही कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत.  

ही लोकं कुठे आहेत त्याची माहिती पोलीस घेत आहेत. ही बोट ओमान येथे रेस्क्यू करण्यात आली होती. तिथे स्थानिक प्रशासनाने त्यांना रेस्क्यू केले होते. रेस्क्यू झाल्यानंतर ओमानमध्ये ही बोट ठेवण्यात आली होती. परंतु समुद्र खवळलेला असल्याने ही बोट तिथून अरबी समुद्रातून वाहत रायगडच्या दिशेला पोहचली. सकाळी ८ वाजता स्थानिकांना ही बोट दिसली. काही लोक बोटीवर गेले तेव्हा हत्यारांचा साठा सापडला. त्यानंतर पोलिसांना माहिती कळवण्यात आली. 

त्यानंतर पोलिसांनी हत्यारांचा साठा जप्त केला. कागदपत्रे ताब्यात घेतली. पोलिसांनी तात्काळ या बोटीबाबत नौदल गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली. ऑन रेकॉर्ड ही बोट यूकेची असल्याचं आढळलं. त्याचसोबत मेरिटम सिक्युरिटी पुरवणाऱ्या कंपनीचं स्किटर एके ४७ च्या बॉक्सवर होते. त्यामुळे ही बोट नेपच्युन सिक्युरिटी मेरेटाइन असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे घातपात आणि दहशतीवादी कनेक्शनचा अद्याप प्राथमिक पुरावे मिळाले नाहीत. 

सरकारनं तात्काळ दखल घ्यावी महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना आहे. केंद्राच्या सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून राज्याच्या सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ दखल घ्यायला हवी. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. संशयित कागदपत्रे सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्य सरकारने यावर त्वरीत टीम नेमून स्थानिक, राज्यातील लोकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी माजी मंत्री आणि स्थानिक आमदार आदिती तटकरे यांनी केली आहे.  

टॅग्स :RaigadरायगडAditi Tatkareअदिती तटकरे