शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक शुल्कमाफीचा महादिलासा, २.३२ लाख व्यवहारांमध्ये फायदा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभय योजनेला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 10:53 IST

Maharashtra Government: राज्यात १९८० पासूनच्या मुद्रांक शुल्काच्या वसुलीबाबत टांगती तलवार असलेल्या २ लाख ३२ हजार व्यवहारांमध्ये लोकांनी कमी भरलेले शुल्क आणि त्यावरील दंडाची रक्कम माफ करणारी वा दंड कमी करणारी अभय योजना राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मंजूर करण्यात आली.

मुंबई - राज्यात १९८० पासूनच्या मुद्रांक शुल्काच्या वसुलीबाबत टांगती तलवार असलेल्या २ लाख ३२ हजार व्यवहारांमध्ये लोकांनी कमी भरलेले शुल्क आणि त्यावरील दंडाची रक्कम माफ करणारी वा दंड कमी करणारी अभय योजना राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मंजूर करण्यात आली.ही योजना निवासी, अनिवासी औद्योगिक वापराच्या प्रयोजनासाठी केलेले सर्व व्यवहार, विक्री करारपत्रे, भाडेपट्ट्याचे दस्त, विक्री प्रमाणपत्र, बक्षीसपत्र, तारण यासाठी लागू आहे. महालेखाकार कार्यालय आणि पुणे येथील मुद्रांक महानिरिक्षक कार्यालयाने केलेल्या चौकशीत राज्यातील २ लाख ३२ हजार व्यवहारांमध्ये मुद्रांक शुल्क नियमापेक्षा कमी भरल्याचे आढळले. अशांना फरकाची रक्कम व दंड वसूल करण्यासाठी नोटिसा पाठविल्या होत्या. आता या दोन्हींबाबत अभय देणारी योजना आहे. 

या योजनेचे दोन टप्पे असतील. १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत अभय योजनेत अर्ज करणाऱ्यांसाठी पहिला टप्पा असेल. त्याअंतर्गत १९८० ते २००० या कालावधीतील व्यवहारांमध्ये एक रुपया ते एक लाख रुपये मुद्रांक शुल्क कमी भरलेले असेल तर अशांना पूर्ण शुल्क माफी मिळेल आणि दंडदेखील पूर्ण माफ केला जाईल. १ लाखाच्या पुढे मुद्रांक शुल्क असेल तर शुल्कात ५० टक्के सवलत तर मुद्रांक शुल्कावर लागू होणाऱ्या दंडावर १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. या योजनेतून सरकारला ६०० कोटी रुपये मिळतील. जनतेला दिलासा देताना २,३२३ कोटींच्या उत्पन्नावर  सरकारने पाणी सोडले आहे.

मुख्यमंत्री अभियान - पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांमध्येस्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यास मान्यता देण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ४५ दिवसांमध्ये हे अभियान राबवायचे आहे. प्रत्येक विभागातून सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची पहिल्या ३ क्रमांकासाठी निवड करण्यात येईल. यासाठी ५१ लाख ते ७ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित सेवानिवृत्ती वेतनऔद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित सेवानिवृत्ती वेतन व अन्य बाबी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन देण्यास सांगितले होते.

झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.  सध्या १ लाख रुपये इतके हस्तांतरण शुल्क आकारले जाते, आता ते ५० हजार रुपये घेतले जाईल.

अल्पसंख्याक महामंडळ, शासन हमी वाढविलीnमौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवून ५०० कोटी इतकी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. सध्या ३० कोटी इतकी शासन हमी देण्यात येते. या शासन हमीचा कालावधी ८ वर्षांचा राहील.

या योजनेचे दोन टप्पे - १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत अर्जकरणाऱ्यांसाठी योजनेचा दुसरा टप्पा असेल. त्यात १ लाख रुपयापर्यंत मुद्रांक शुल्क देय असेल तर मुद्रांक शुल्कात ८० टक्के सवलत तर दंडाच्या रकमेत ८० टक्के सवलत देण्यात येणार आहे. - तर १ लाखापेक्षा जास्त शुल्कावर ४० टक्के सवलत व दंडाच्या रकमेत ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

२६०० खंडकरी शेतकऱ्यांना दिलासाशेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ६ जिल्ह्यांतील १० तालुक्यांतील ३८ हजार ३६१ एकर क्षेत्राचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-१ होणार असून त्याचा लाभ २६०० खंडकरी शेतकऱ्यांना होणार आहे.

२५ कोटींच्या मुद्रांकावर २० टक्के सवलत१ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील व्यवहारांसाठी ही योजना राबविताना २५ कोटीपर्यंंत मुद्रांक शुल्क कमी भरले असेल तर त्यात २५ टक्के सवलत, तर दंडाच्या रकमेत ९० टक्के सूट, तर २५ कोटींवर मुद्रांक शुल्क असेल तर २० टक्के सवलत तर दंडाच्या रकमेत १ कोटी रुपये दंडाची रक्कम स्वीकारून इतर दंड माफ करणे, अशी सवलत आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMumbaiमुंबई