शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी कोल्हापूर दौरा रद्द केला; स्थानिकांची काळे झेंडे, बाजारपेठा बंद ठेवण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 14:36 IST

शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना शिंदेंनी तो रद्द न करता या मार्गाचे फेरसर्वेक्षण करण्याचे म्हटले होते. यामुळे चळवळींचा जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूरात शेतकऱ्यांसह सर्वच स्तरांतून शिंदेंच्या दौऱ्याला विरोध होत आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध स्थानिक संघटनांचा विरोध पाहून कोल्हापूर दौरा रद्द केला आहे. मंगळवारी ते कोल्हापूर शास्वत विकास परिषदेसाठी येणार होते. परंतू, मुख्यमंत्र्यांनी हद्दावाढ, सर्किट बेंचसह आधीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार होते. 

हद्दवाढ कृती समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत मंगळवारी कोल्हापूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. माजी महापौर आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला विऱोध होत असून शिंदे यांना मोर्चाद्वारे जाब विचारण्याचा इशाराही देण्यात आला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यावेळी कोल्हापूर कडकडीत बंद करण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौकात एकत्र येऊ. तेथून शहरात मोटारसायकल रॅली काढून बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन करू, याशिवाय मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचे पोस्टर तयार करून त्याला काळे फासू, पोलिसांचे कडे तोडून मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवू, असे या बैठकीत ठरविण्यात आले होते. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. शाश्वत परिषदेला शिंदे ऑनलाईन हजर राहणार आहेत. शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना शिंदेंनी तो रद्द न करता या मार्गाचे फेरसर्वेक्षण करण्याचे म्हटले होते. यामुळे चळवळींचा जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूरात शेतकऱ्यांसह सर्वच स्तरांतून शिंदेंच्या दौऱ्याला विरोध होत आहे. 

अशास्वत सरकारकडून शास्वत परिषद कसली?अॅड. इंदूलकर म्हणाले, शिंदे यांचे सरकारच आहेत. एक फूल दोन हाफचे सरकार आहे. यांचे सरकारच अशास्वत असताना शास्वत विकास परिषद कसली घेता? विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने शास्वत विकासाचे गाजर दाखवले आहे. शासनाचा हा फुगा आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkolhapurकोल्हापूर