शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हावरुन वाद : ओबीसी फेडरेशनच्या मागणीला ब्राहमण महासंघाचा विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 20:21 IST

परस्परविरोधी मागण्यांमुळे नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पुणे : सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामधून कमळातील 'शनिवारवाडा' काढून जागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावावी अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनसह पंधरा संस्थांनी केली आहे. मात्र शनिवारवाडा हा पुण्याचा नव्हे तर देशाचा मानबिंदू आहे असं सांगत या मागणीला अखिल भारतीय ब्राहमण महासंघाने बोधचिन्ह बदलण्यास विरोध केला आहे. या परस्परविरोधी मागण्यांमुळे नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.                     याबाबत अधिक माहिती अशी की, 1948साली तत्कालीन पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचे 1950साली कमळात शनिवारवाडा असे बोधचिन्ह तयार करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाचे फुले यांच्या नावाने नामांतर करण्यात आले आहे. मात्र सध्यातरी बोधचिन्ह बदलण्यात आलेले नाही.त्यामुळे बोधचिन्हात तात्काळ बदल करावा व फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यात यावा अशी मागणी काही संस्थांनी केली आहे.                   यावेळी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे सचिन माळी म्हणाले आहेत की, शनिवारवाडा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही. शनिवारवाडा हा बहुजनांच्या आणि स्त्रियांच्या गुलामगिरीचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्याप्रमाणे पुण्यातही फुले यांची प्रतिमा वापरावी.                   मात्र या मागणीला विरोध करत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी असा मूर्खपणा सरकारने किंवा विद्यापीठ प्रशासनाने केल्यास   तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत ते म्हणाले की, या वाड्यात  केलेला राज्यकारभार हा मराठा साम्राज्यासाठी महत्वाचा असून तो कोणालाच पुसता येणार नाही. शनिवारवाड्याची प्रतिमा विद्यापीठ बोधचिन्हातून  हलवण्याच्या ओबीसी सत्य शोधक फेडरेशनच्या मागणीचा आम्ही तीव्र धिक्कार करीत आहोत अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ही परिस्थिती बघता विद्यापीठ प्रशासन काय निर्णय घेते हेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेPune universityपुणे विद्यापीठPoliticsराजकारण