शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरेगाव भीमा हिंसाचार घडविण्यासाठी मोठे षडयंत्र’, ‘कम्युनिस्ट पार्टीशी असलेल्या संबंधांचा तपास करणे गरजेचे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 06:29 IST

कोरेगाव भीमा हिंसाचार घडवण्यासाठी मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते आणि त्याचे फार गंभीर परिणाम झाले, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात प्रा. आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार देताना नोंदविले.

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार घडवण्यासाठी मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते आणि त्याचे फार गंभीर परिणाम झाले, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात प्रा. आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार देताना नोंदविले.कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर गुन्हा नोंदविला. मात्र अद्याप त्यांना अटक केलेली नाही. गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती. त्यांची याचिका फेटाळताना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले.आपल्याला नाहक या प्रकरणात गुंतविण्यात आले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या घटनेवेळी आपण गोव्यात होतो. तसेच पोलिसांकडे आपल्याविरुद्ध सबळ पुरावे नाहीत, असा दावा तेलतुंबडे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयात केला. त्यावर सरकारी वकिलांनी न्यायालयात एक पत्र सादर केले. तसेच पोलिसांकडे तेलतुंबडे यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाला सांगितले.‘हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. फार मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते. गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे,’ असे न्यायालयाने तेलतुंबडे यांची याचिका फेटाळताना म्हटले.‘तेलतुंबडे हे सीपीआयचे सदस्य आहेत हे सिद्ध करण्यापलीकडेही तपास केला आहे. पोलिसांनी त्यांचा या प्रकरणातील सक्रिय सहभाग स्पष्ट करणारे पुरावे जमा केले,’ असेही न्यायालयाने म्हटले. सरकारी वकिलांनी एका आरोपीने लिहिलेल्या पत्रात आनंद तेलतुंबडे यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्याचा आधार घेत न्यायालयाने म्हटले की, पत्रात उल्लेख असलेला ‘आनंद’ किंवा ‘कॉ. आनंद’ आणि आनंद तेलतुंबडे एकच आहेत, हे पटवून देण्याइतपत पोलिसांकडे पुरावे आहेत. गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमाप्रकरणी १० आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले.तपास यंत्रणेने केलेल्या तपासावर समाधान व्यक्त करताना न्यायालयाने म्हटले की, पुणे पोलिसांकडे तेलतुंबडे यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असून त्यांनी केलेले आरोप तथ्यहीन नाहीत. सुरुवातीला हा तपास केवळ १ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेपुरताच मर्यादित होता.मात्र आता यामध्ये सहभागी असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या इतर कामांबद्दलही तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे तेलतुंबडे यांचे बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टीशी काय संबंध आहेत, याचा तपास करण्याची आवश्यकता आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Courtन्यायालयMaharashtraमहाराष्ट्र