शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेनेचे १५ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 08:55 IST

येत्या १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० शिवसेना आमदारांचा गट बनवून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण केले. शिंदे यांच्या पवित्र्यामुळे उद्धव ठाकरे यांना राज्यातील सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद सोडण्याची नामुष्की ओढावली. शिंदे यांनी ५० आमदारांना सोबत घेऊन भाजपाला साथ दिली. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि उपमुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर आली. 

आमदारांसोबत अनेक नगरसेवकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदारांचा मोठा गट शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. खासदारांचा दोन तृतीयांश गट शिंदे गटात सहभागी होऊ शकतो. सध्या याबाबत हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. यात शिवसेनेचे १५ खासदार उपस्थित होते. ४० आमदारांनंतर शिवसेनेच्या १८ पैकी १५ खासदार वर्षा बंगल्यावर ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे. 

शिवसेना खासदारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यात संसदीय कार्यकारणीचा मोठा गट जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला तर संसदीय राजकारणातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा राहिल. विविध महापालिकेतील नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे बंड शिवसेनेसमोर आव्हान निर्माण करणारं आहे. 

राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेचा NDA उमेदवाराला पाठिंबायेत्या १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेच्या काही खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होते. त्यानंतर खासदारांमध्येही बंड होऊ नये यासाठी सावध भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. एका आदिवासी समाजातील नेतृत्वाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. जी भूमिका आता उद्धव ठाकरे यांनी घेतली ती अडीच वर्षापूर्वी घेतली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे