नाशिक : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म, परिसर व चंद्राई बंगल्याच्या मूल्यांकनाचे काम मंगळवारीही मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून सुरू होते. मूल्यांकनाचे काम अजून अपूर्ण आहे. किमान आठवडाभर ही प्रक्रिया चालेल.सोमवारपासून भुजबळ फार्म व येथील जुन्या-नव्या बंगल्यांचे क्षेत्र आणि विविध वस्तूंची मोजदाद सुरू आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. तपासाचा एक भाग म्हणून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भुजबळ यांचे वकील अॅड. जालिंदर ताडगे यांनी दिली.गोविंदनगर भागातील आलिशान ‘भुजबळ फार्म’च्या मालमत्तेचे अचूक मूल्यांकन करण्याचा निश्चय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. संपूर्ण गृहसजावटींच्या वस्तूंपासून तर लाकडी फर्निचरची तपासणी करण्यात येत आहे. आकर्षक विद्युत व्यवस्था पडताळण्यात आली. विविध महागड्या दिव्यांपासून तर आवार सुशोभित करण्यासाठी लॉन्स व महागडे परदेशी रोपट्यांपर्यंत फेरमुल्यांकन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. (प्रतिनिधी)>मफलरचीही मोजदाद!भुजबळांच्या बंगल्याची दाखविलेली किंमत आणि प्रत्यक्ष बाजारमूल्य यात मोठी तफावत असल्याचे सुत्रांकडून समजते. दगड, माती, लाकूड आणि सजावटीसाठी लावलेले परदेशी प्रजातीचे महागडे झुडूप अशा सर्वच बाबींचे मूल्यांकन सुरू आहे. मातीपासून मफलरपर्यंतची ‘किंमत’ अधिकाऱ्यांकडून ठरविली जात आहे.
भुजबळ फार्म, ‘चंद्राई’चे मूल्यांकन अपूर्ण
By admin | Updated: August 24, 2016 05:27 IST