शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

भुजबळांचा जामीन; उद्या निर्णय

By admin | Updated: May 12, 2016 03:28 IST

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या जामिनाबाबत शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात सध्या ते अटकेत आहेत.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या जामिनाबाबत शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात सध्या ते अटकेत आहेत. भुजबळ यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागितला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात अन्य ३४ आरोपींच्या अटकेसाठी सहा आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. यात प्रामुख्याने पंकज भुजबळ, राज्यसभेचे सदस्य संजय काकडे, बिल्डर असिफ बलवा, विनोद गोएंका यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट आहे. यातील बहुतांश आरोपींनी हे वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज केलेले आहेत. पण पंकज भुजबळ यांनी यासंदर्भात कोणतेही पाऊल उचललेले नाही. दरम्यान, समीर भुजबळ यांना जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आले, त्याचवेळी छगन भुजबळ यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे हजेरी झाली. या दोघांचीही न्यायालयीन कोठडी २५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. भुजबळांचे वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी सांगितले, की भुजबळ यांना काही वर्षांपासून जुने आजार आहेत. अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार त्यांना आहेत. तथापि, या जामिनाला विरोध करताना ईडीच्या वकील पौर्णिमा कंथारिया यांनी सांगितले, की अनेक वर्षांपासून भुजबळ यांना हा त्रास आहे. परंतु या काळात आणि आताही दैनंदिनीत काही समस्या उद्भवली नाही. भुजबळ यांना योग्य त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जामिनासाठी हे कारण होऊ शकत नाही, असेही त्या म्हणाल्या. राज्यसभेचे सदस्य संजय काकडे यांच्या वकिलाने काकडेंवर बजावण्यात आलेले वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. त्यावरील सुनावणी न्यायालयाने गुरुवारपर्यंत लांबणीवर टाकली.> छगन भुजबळ यांना असलेले आजार१९८० पासून श्वासनलिकेसंबंधीचा दमा (अस्थमा). त्यावर १९९९ पासून बाँबे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. दम्यासाठी ते नेब्युलायझर वापरतात.१९९० पासून मधुमेह आणि अति रक्तदाब. दिवसातून दोन ते तीन वेळा रक्तातील साखरेची पातळी तपासणे आवश्यक आहे.२००० पासून श्वास घेताना तो थांबण्याचा त्रास.२००४ मध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांच्या अँजिओप्लास्टीचा उपचार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाला.२०१४ पासून हृदयाचे ठोके हळू होणे व बेशुद्धावस्थेचा त्रास.