शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

भातसा, बारवी धरणांनी गाठला तळ; अत्यल्प जलसाठा शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 04:20 IST

भातसात २८ टक्के, तर बारवी धरणात केवळ २३ टक्के पाणीसाठा

सुरेश लोखंडे ठाणे : मुंबई, ठाणे या महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात २७० दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ २८.७१ टक्के, तर ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात अवघा २३.५५ टक्के म्हणजे ५४.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सद्य:स्थितीत शिल्लक आहे. धरणातील या पाण्याची उपलब्धता लक्षात घेता, धरण क्षेत्रात अल्पावधीतच पावसाचे आगमन होणे अपेक्षित आहे. अन्यथा, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे महानगरांना पाणीपुरवठा करणाºया धरणांपैकी भातसा हे सर्वात मोठे ब्रिटिशकालीन जलाशय आहे. या धरणाची ९४२.१०० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. यापैकी धरणात सध्या २७०.४९० दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी या धरणात आजच्या दिवशी ३२९.७१ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३५ टक्के पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस पडूनही या धरणात अल्पावधीसाठी पुरेल एवढाच पाणीसाठा जलाशयात शिल्लक आहे. बारवी धरणात ४६ दिवस पुरेल एवढाच, म्हणजे २३.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?बारवीची २३३.०७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठवण क्षमता आहे. आज या धरणात ५४.८९ दशलक्ष घनमीटर साठा असून, गेल्या वर्षी हा ८३.२९ दशलक्ष घनमीटर साठा होता. मोडकसागर धरणात ३४.२७ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ४४.१२ टक्के होता.तानसात ९.८४ टक्के साठा आहे, गेल्या वर्षी १६.८९ टक्के होता. बारवीप्रमाणेच ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भाईंदर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणातही ९०.९० दशलक्ष घनमीटर म्हणजे २६.८० टक्के साठा आहे. गेल्या वर्षी या धरणात ३२ टक्के साठा होता.

टाटाच्या मालकीचे असलेल्या या आंध्रा धरणातील पाणी उल्हास नदीत सोडले जाते आणि तेच पाणी ठाणे जिल्ह्यातील शहरांना उपलब्ध करून दिले जाते. पण, या धरणातही यंदा कमी साठा आहे.

त्यामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यांतील शहरांना पाणीपुरवठा करणाºया धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन होण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. अन्यथा, १५ जुलैपर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.