शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Bhandara–Gondiya Bypoll 2018 : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या गोंधळामुळे 49 ठिकाणी होणार फेरमतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 18:27 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाडाच्या घोळानंतर अखेर 49 ठिकाणी फेरमतदान होणार आहे.

मुंबई : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाडाच्या घोळानंतर अखेर 49 ठिकाणी फेरमतदान होणार आहे.भंडारा-गोंदियात काल (दि.28) मतदान पार पडले. मात्र, काही ठिकाणी मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. काल मतदानाला सुरूवात झाल्यानंतर अर्धा ते एक तासानंतर ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशीममध्ये बिघाड आल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे काही मतदान केंद्रावरुन शेकडो मतदारांना मतदान न करताच परत जावे लागले. तर निवडणूक विभागाने गोंदिया शहरातील 10 मतदान केंद्रात एैनवेळी बदल केला. मात्र याची माहिती बऱ्याच मतदारांना नसल्याने त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. गोंदिया विधानसभा मतदार संघातील 65 मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशीनमध्ये बिघाड असल्याच्या लेखी तक्रारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत वालस्कर यांना प्राप्त झाल्या. त्यानंतर या तक्रारींची चाचपणी करुन वालस्कर यांनी 35 केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबविण्याचे आदेश काढले होते.दरम्यान, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये काल झालेल्या बिघाडाच्या घोळानंतर निवडणूक आयोगाने आज एकूण 49 ठिकाणी फेरमतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Bhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018Electionनिवडणूक