शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वाहनधारकांनो सावधान; महामार्गावरुन प्रवास करताय तर फास्टॅग हवाच !

By appasaheb.patil | Updated: November 7, 2019 12:40 IST

चारचाकी वाहनांना फास्टॅग बसवणे अनिवार्य; एक डिसेंबर पासून पथकर नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना आता चारचाकी वाहनांना फास्टॅग बसवणे अनिवार्य पथकर नाक्यावर एक डिसेंबर २०१९ पासून रोख रक्कमेच्या माध्यमातून पथकर स्वीकारला जाणार नाहीरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सन २०१६ पासून फास्टॅग इलेक्ट्रॉनिक सिस्टीम सुरु

सोलापूर :  राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना आता चारचाकी वाहनांना फास्टॅग बसवणे अनिवार्य आहे.  कारण पथकर नाक्यावर एक डिसेंबर २०१९ पासून रोख रक्कमेच्या माध्यमातून पथकर स्वीकारला जाणार नाही. तरी चारचाकी आणि त्यापुढील वाहनधारकांनी फास्टॅग बसवून घ्यावे, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सन २०१६ पासून फास्टॅग इलेक्ट्रॉनिक सिस्टीम सुरु केली आहे. त्यानुसार ७ मे  २०१८ रोजी केंद्र सरकारने याबाबतचे राजपत्रही जाहीर केले आहे. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे, असे कदम यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. कदम यांनी नमूद केले आहे की, फास्टॅग ही यंत्रणा सर्व पथकर नाक्यावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, आयडीएफसी आदी बँक शाखेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर फास्टॅग आॅनलाइन परचेस पोर्टल वरही उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवर  फास्टॅग अ‍ॅप्लकेशन उपलब्ध आहे.-------------------फास्टॅग काय आहे ?फास्टॅग एक पातळ ईलेक्ट्रॉनिक चिप आहे. ही चिप वाहनांच्या दर्शनी भागात चिकटविण्यात यावी. ही चिप निश्चित केलेल्या रक्कमेला खरेदी करता येईल. ही चिप ग्राहकांच्या बँक अकाऊंटला जोडता येते. -------------फास्टॅग कसे काम करते ?फास्टॅग चिकटवलेले वाहन पथकर नाक्यावरुन पुढे जाईल त्यावेळेस निश्चित केलेला पथकर वाहनधारकाच्या  फास्टॅगँ अकाऊंटमधून वजा होईल.फास्टॅग ओळखण्यासाठी पथकर नाक्यावर विशेष उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याव्दारे फास्टॅग चिप ओळखली जाईल. चिप स्कॅन झाल्यावर पथकर नाक्यावरील बूम आपोआप उघडले जाईल आणि वाहनास थांबावे न लागता पुढे जाता येईल.------------फास्टॅग वापरण्याचे फायदे...फास्टॅगच्या वापरामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याबाबत ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन आॅफ इंडिया आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट कोलकता यांनी सविस्तर अभ्यास केला आहे. त्यानुसार दरवर्षी देशभरात ८७ हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे, असेही संजय कदम यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Solapurसोलापूरtollplazaटोलनाकाhighwayमहामार्ग