शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक; डोळ्यांच्या दुखापतींमध्ये होतेय वाढ

By सुमेध वाघमार | Updated: November 10, 2023 20:43 IST

१६ वषार्खालील मुलांच्या दुखापतीचा टक्का ४९ टक्क्यांवर

सुमेध वाघमारे, नागपूर :  दिवाळी म्हणजे अमावस्येच्या काळोखाला भेदणारा प्रकाशाचा सण. रोशणाईचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. पण कधी कधी अति उत्साहाता सुरक्षेकडे जरा दुर्लक्ष होते. विशेषत: फटाक्यांमुळे अंधत्वाची जोखीम निर्माण होते. देशात दरवर्षी सुमारे पाच हजारावर लोकांची दृष्टी जाते. अनार, सुतळी बॉम्ब, चक्री आणि रॉकेट या फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

फटाक्यांमुळे होणाºया अंधत्वाचे प्रमाण जागतिक पातळीवर पाच लाखांवर आहे. फटाक्यात चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट, परफ्लोरेट आदी घटक असतात. या घटकाचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो. फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना व फुफ्फुसांना तसेच त्वचेला अपायकारक असतो. दमा व अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढते. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, वायुप्रदूषण व सामाजिक प्रदूषण होते. फटाके फोडलेल्या ठिकाणाचे तापमान ४०० ते ५०० डीग्री पर्यंत वाढते. यामुळे फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होणाºयांची संख्या सर्वाधिक असते.

फटाक्यांच्या धोक्यापासून १६ वर्षाखालील मुलांना जपा

बंगरुळू येथील शासकीय मिंटो ऑप्थल्मोलॉजी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नोंदीनुसार, २००८ ते २०२० या कालावधीत फटाक्यांमुळे डोळ्यांना झालेल्या दुखापतींवरील आणि रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती सादर केली आहे. यात फटाक्यांमुळे झालेल्या डोळ्यांच्या दुखापतींपैकी १६ वषार्खालील मुलांचा वाटा ४९.३ टक्के आहे. यामुळे फटाक्यांपासून १६वर्षाखालील मुलांना जपा असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञानी केले आहे.

बघणाऱ्यांना जास्त इजा

सारक्षी नेत्रालयाच्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. रिंकल फुसाटे, नेत्ररोग तज्ज्ञ फटाके फोडणाºयांपेक्षा बघणाºयांना याची जास्त इजा होते. कारण, स्फोटामुळे दगड, माती वेगाने उडते व डोळ्याला व इतर अवयवांना इजा होऊ शकते. फटाक्यात जळती ठिणगी किंवा घटक गेल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. दृष्टिहीनता, अंधत्व व गंभीर दुखापतींमुळे डोळा गमवाव लागू शकतो. बारुदमुळे डोळ्यांना रासायनिक इजा होऊ शकते.

जखम झाल्यास तातडीने नेत्ररोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या

फटाक्यामुळे डोळ्याला इजा झाल्यास तातडीने नेत्ररोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या. डॉक्टरांपर्यंत पोहचतपर्यंत डोळे चोळू नका. यामुळे डोळ्यातील द्रव्य बाहेर येऊ शकते किंवा डोळ्यात फसलेले कण आत खोलवर जाऊ शकतात. डोळा खराब होण्याची शक्यता असते. स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत. शक्य तितक्या लवकर जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञांना दाखवून उपचार करावा.-डॉ. रिंकल फुसाटे, नेत्ररोग तज्ज्ञ

या लक्षणांकडे दुर्लक्ष नको!

  • फटाक्यांमुळे डोळा लाल होणे
  • पाणी जाणे
  • डोळा दुखणे
  • अचानक डोळ्याची नजर कमी होणे
  • उजेड सहन न होणे
  • डोके दुखणे
  • डोळ्यात चिपड येणे
  • डोळे सुजणे, उलटी होणे
टॅग्स :nagpurनागपूर