शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बेस्टला महापालिकेचा ठेंगा; जबाबदारी नाकारली, आर्थिक आधार देण्यास दिला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:16 IST

बेस्ट कामगारांना संप मागे घेण्यास भाग पाडताना सत्ताधारी शिवसेनेने महापालिका जबाबदारी उचलेलं असे अाश्वासन दिले हाेते. मात्र प्रशासनाने शिवसेनेचे आश्वासन खाेटे पाडत बेस्टला आर्थिक आधार देण्यास नकार दिला आहे.

मुंबई, दि. 23 - बेस्ट कामगारांना संप मागे घेण्यास भाग पाडताना सत्ताधारी शिवसेनेने महापालिका जबाबदारी उचलेलं असे अाश्वासन दिले हाेते. मात्र प्रशासनाने शिवसेनेचे आश्वासन खाेटे पाडत बेस्टला आर्थिक आधार देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी विरूद्ध प्रशासन असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढील पाच वर्षे बेस्टला सुमारे १० हजार कोटी रुपये देण्याची मागणी होत आहे. मात्र हे पैसे देऊन बेस्टच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, परंतु सेवेत कोणताही बदल होणार नाही. हे पैसे दिल्यास मुंबई महापालिकेच्या प्रकल्पांकरिता १० हजार कोटी रुपयांची तूट निर्माण होईल. 

त्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल, पण मी एक छदामही देऊ शकत नाही, असे आयुक्तांनी पालिका अर्थसंकल्पावर निवेदन करताना स्पष्ट केले.बेस्टचा नफा ५०० कोटी रुपयांचा असला तरी त्यात ३०० कोटींची तूट आहे, असे आयुक्तांनी निदर्शनास आणले आहेे. तर महापालिकेला मलजल शुद्धीकरण केंद्र, गोरेगाव- मुलुंड जाेडरस्ता, पाणी प्रकल्प, कोस्टल रोड आदींसाठी एकूण ५७ हजार ८०० कोटी रूपयांची गरज आहे. या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपयांची तूट महापालिकेला येणार आहे. त्यामुळे बेस्टला १० हजार कोटी रुपये देणे योग्य होणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.ठेवींच्या माध्यमातून मदत करावी-मुंबई महापालिकेच्या ६० हजार कोटींच्या ठेवी आहेत, त्यातून पुढील पाच वर्षे नऊ हजार ७०० कोटी रुपयांचा निधी बेस्टला देण्याची मागणी केली जात आहे. या मुदत ठेवींपैकी १८ हजार ९७६ कोटी रुपये भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतनाची रक्षक तसेच ठेकेदारांची अनामत रक्कम यातील आहे. यातून सुमारे ४२ कोटी रुपये शिल्लक राहतात.

ताेटा कायम राहणार-बेस्टला ९७०० कोटी रुपये दिल्यास बेस्टची सेवा सुधारणार नाही. आता जो तोटा होत आहे, तो पाच वर्षांनंतरही होणार आहे. त्यामुळे बेस्टच्या आर्थिक तुटीवर उपाय शोधायला हवा. शेअर टॅक्सी आणि रिक्षा सेवा बंद करण्यात यावी, अशी सुचना पुढे येत आहे. परंतु आपण स्पर्धेच्या युगात असल्याने शेअर रिक्षा, टॅक्सी सोबतच एप बेस्ड टॅक्सी असताना बेस्टला कसे पुढे नेता येईल, याचा विचार करायला हवा. बेस्ट बस वेळेवर धावणे, प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण करणे हे दोन उपाय करावे लागतील, असे आयुक्तांनी सुचविले आहे.

फिडर मार्गांवर भाडेवाढ टाळणे

बेस्टचे ७० ते ७५ टक्के प्रवासी छोट्या मार्गगावरील आहेत. त्यामुळे तिकीट दरात वाढ करताना छोटे बसमार्ग वगळावे. कामगारांच्या सेवा, सुविधा, भत्ते बंद  करावे.