चेतन भगतला मागे टाकत सुदीप नगरकर ठरला बेस्ट सेलर

By Admin | Updated: October 2, 2015 13:49 IST2015-10-02T13:49:36+5:302015-10-02T13:49:58+5:30

इंग्रजी साहित्य क्षेत्रातील मराठमोळा लेखक सुदीप नगरकरने पुन्हा एकदा बेस्ट सेलरच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे.

Best cinematographer, Sudip Nagarkar is behind Chetan Bhagat | चेतन भगतला मागे टाकत सुदीप नगरकर ठरला बेस्ट सेलर

चेतन भगतला मागे टाकत सुदीप नगरकर ठरला बेस्ट सेलर

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २ - इंग्रजी साहित्य क्षेत्रातील मराठमोळा लेखक सुदीप नगरकरने पुन्हा एकदा बेस्ट सेलरच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या  'यू आर ट्रेडिंग इन माय लाईफ' या सुदीपच्या कादंबरीचे ५० हजारहून अधिक प्रति विकल्या गेल्या असून बेस्ट सेलरच्या स्पर्धेत सुदीपने चेतन भगतलाही मागे टाकले आहे. 

ठाणेकर असलेल्या सुदीप नगरकरने महाविद्यालयात स्वतःच्या प्रेमाच्या संघर्षावर लेखन करुन इंग्रजी साहित्य क्षेत्रात पाऊल टाकले होते. सुदीपच्या या कादंबरीला वाचकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला व इंग्रजी लेखन विश्वात ठाणेकर सुदीपने स्वत:ची ओळख निर्माण केली. दोन आठवड्यांपूर्वी सुदीपची 'यू आर ट्रेंडिग इन माय लाईफ' ही कादंबरी प्रकाशित झाली होती. चार मित्रांवर आधारित या कादंबरीला वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत चेतन भगतची मेकिंग इंडिया ऑसम हे पुस्तक प्रकाशित झाले होते. बेस्ट सेलरच्या स्पर्धेत सुदीपने चेतनला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. सर्वाधिक खपाच्या टॉप १० कादंबरींमध्ये मध्ये सुदीपची  कांदबरी पहिल्या तर चेतनचे पुस्तक दुस-या स्थानावर आहे. 

Web Title: Best cinematographer, Sudip Nagarkar is behind Chetan Bhagat