शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

जिल्ह्यात सर्वत्र जमके बरसला

By admin | Updated: September 22, 2016 03:24 IST

यंदा वरुणराजाने ठाणे जिल्ह्यावर चांगलीच कृपादृष्टी केली असून या मोसमात पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आहे.

ठाणे : यंदा वरुणराजाने ठाणे जिल्ह्यावर चांगलीच कृपादृष्टी केली असून या मोसमात पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आहे. यंदा पावसाने ठाणे जिल्ह्यातील सरासरीचा पल्लाही ओलांडला आहे. जिल्ह्यातील ७ पैकी ठाण्यात १२६, कल्याण १०८, मुरबाड १०७ टक्के असा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल साडेपाच हजार मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. दुसरीकडे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी ठाणे- पालघरातील सर्वच धरणे ओव्हरफलो झाली आहेत. मागील तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पालघरातील धामणी, कवडास, वांद्री या धरणांसह ठाण्यातील मोडकसागर आणि बारवी धरण १०० टक्के भरले होते. मात्र, ठाणे जिल्ह्यातील भातसा आणि तानसा धरणे भरायची शिल्लक होती. तीही सध्या चालू असलेल्या परतीच्या पावसात सरासरी भरून झाली आहेत. दरम्यान, परतीच्या पावसाची बुधवारीही दिवसभर रिपरिप सुरू होती. शहरातील काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले. त्यामुळे वाहतूककोंडीही झाली होती. वरुणराजाचा सध्याचा मूड पाहता सप्टेंबर संपेपर्यंत आकडेवारीच्या नवीन अध्यायाची नोंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, असे असले तरी येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार अतिवृष्टीची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळवण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठाण्यात मागील २४ तासांत ७२ मिमी पावसाची नोंद झाली असून शहराच्या विविध भागांत रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक भागांत वाहतूककोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. आगीची एक, शॉर्टसर्किटची एक आणि एका ठिकाणी प्लास्टर पडल्याची घटना घडली आहे. परंतु, येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून त्यानुसार त्या ठिकाणच्या महापालिका, नगरपालिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. गेल्या वर्षीच्या पावसाच्या तुलनेत यंदा ठाणे-मुंबईला पाणीपुरवठा करणारी जवळपास सर्वच धरणे वेळेत दुथडी भरून वाहू लागली. त्यामुळे यंदा तरी ठाणे-मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.>तालुक्यात आतापर्यंतचा सरासरी पाऊस ठाणे -३ हजार १२१ मिमी (१२६.४६), कल्याण २ हजार ६७४ मिमी (१०८.९६), मुरबाड - २ हजार ५११ मिमी (१०७.८५), उल्हासनगर - २ हजार ३६८ मिमी (९२.६३), अंबरनाथ - २ हजार २८६ मिमी (९६.७१), भिवंडी - २ हजार ४१६ मिमी (९९.७७), शहापूर - २ हजार १२५ मिमी (८३.१५), एकूण पाऊस - १७ हजार ५०३ मिमी (१०२.०६) (सर्व आकडे टक्क्यांत)