शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात साकारणार बंगाली, तेलगु अकादमी; अत्याधुनिक महासंग्रहालयही बनणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 06:02 IST

राज्यात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत अत्याधुनिक महासंग्रहालय उभे केले जाईल, अशी घोषणाही मुनगंटीवार यांनी केली.

मुंबई : राज्यात सध्या मराठी, हिंदी, सिंधी या अकादमी अस्तित्वात आहेत. त्यांचे कार्य उत्तमरीत्या सुरू असून, आता तेलगु आणि बंगाली अकादमी स्थापन केली जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. सांस्कृतिक अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.

राज्यात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत अत्याधुनिक महासंग्रहालय उभे केले जाईल, अशी घोषणाही मुनगंटीवार यांनी केली. राज्यात लहान लहान संग्रहालये असून, या संग्रहालयांमध्ये असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा व्यवस्थित जतन करण्याचा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतला आहे. त्यासाठीच महासंग्रहालय उभे करून त्या ठिकाणी हा सर्व ठेवा जतन केला जाईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

गडकिल्ल्यंसाठी महावारसा समितीगडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने महावारसा समिती स्थापन केली आहे. ही समिती योजना आखणार असून, अंमलबजावणीसाठी सीएसआर निधीची मदत घेतली जाणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेत ३ टक्के निधी राखून ठेवण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारVidhan Parishadविधान परिषद