शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण : वाढीचा विचार अधिवेशनावेळी, देवेंद्र फडणवीस यांची पत्रपरिषदेत ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 07:52 IST

लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाईल, निकषाच्या बाहेर आहेत त्यांच्याबाबत पुनर्विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पहिल्या पत्रपरिषदेत सांगितले.

मुंबई : लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाईल, निकषाच्या बाहेर आहेत त्यांच्याबाबत पुनर्विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पहिल्या पत्रपरिषदेत सांगितले. कोणावरही अन्याय केला जाणार नाही, अशी ग्वाही देतानाच त्यांनी या योजनेतील मानधन १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी (एप्रिल) केला जाईल, असे स्पष्ट केले.

शेतकरी सन्मान निधी योजनेत काही शेतकऱ्यांना निकषाबाहेर मदत दिली गेली, असे लक्षात आले होते. त्यावर कार्यवाही करून निर्णय घेण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेत निकषात बसत नसतानाही मानधन दिले जात असल्याचे छाननीत लक्षात आले तर पुनर्विचार करू असे ते म्हणाले.

मोठ्या उद्योगांची लवकरच घोषणा

जनतेला लवकरच मोठी गुंतवणूक येणार असल्याची बातमी मिळेल. मोठ्या कंपन्यांशी माझी या गुंतवणुकीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. परकीय गुंतवणुकीबाबत राज्य पहिल्या क्रमांकावरच ठेवण्याचे उद्दिष्ट असेल ते म्हणाले.

टेस्ट मॅच खेळायची आहे शिंदे आणि मी असे सरकार होते तेव्हा वनडे खेळायची होती, अजितदादा सोबत आले तेव्हा टी-२० खेळायची होती. आता पाच वर्षे हाताशी आहेत. आज मंत्रालयात आल्यानंतर मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, आता आपल्याला टेस्ट मॅच खेळायची आहे. योग्यरीत्या निर्णय घेत पुढे जायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

भूमिका बदलली तरी आमची दिशा, गती, समन्वय तोच महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी भूमिका आमच्यात बदलली असली तरी आधीच्या सरकारमध्ये असलेली दिशा, गती आणि समन्वय राज्याला पुन्हा दिसेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

महायुती सरकारने घेतलेले लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण पुढेही चालू राहील. दुष्काळमुक्त महाराष्ट्राला आमचे प्राधान्य असेल. लोकाभिमुख सरकार आम्ही देऊ. विरोधी पक्षांना सन्मान देऊ, त्यांचा आवाज दाबणार नाही. बदल्याचे नाही तर बदलाचे राजकारण करू, असे ते म्हणाले.

जातजनगणनेला विरोध नाही

जातनिहाय जनगणना करण्यास भाजपचा विरोध नाही; पण या जनगणनेचा शस्र म्हणून वापर होता कामा नये. तसेच मायक्रो ओबीसी जातींवर त्यामुळे अन्यायही होता कामा नये, अशी आमची भूमिका असल्याचे फडणवीस म्हणाले.

शिंदे नाराज नाहीत

एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या वृत्ताचा फडणवीस यांनी इन्कार केला. मी त्यांना विनंती केल्यानंतर मंत्रिमंडळात येण्याचे त्यांनी तत्काळ मान्य केले. त्यांच्या नाराजीच्या बातम्या केवळ माध्यमांमध्ये होत्या, असे ते म्हणाले.