शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"मराठी माणसाचा घात करू नये..."; बेळगाव सीमावासियांचे संभाजीराजेंना खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 13:16 IST

कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली. त्याविरोधात मराठी माणसाने वेळोवेळी संघर्ष केला असं या पत्रात म्हटलं आहे.

बेळगाव - जिल्ह्यातील राजहंस गडावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात हजेरी लावल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीने छ. संभाजीराजेंना खरमरीत पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नेत्यांनी हजेरी लावू नये असं आवाहन समितीने केले होते. तरीही काँग्रेस नेते सतेज पाटील, आमदार धीरज देशमुख यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे यांनी उपस्थिती लावली. त्यावरून सीमावासियांमध्ये नाराजी पसरली आहे. 

महाराष्ट्र एकिकरण समितीने संभाजीराजेंना पाठवलेलं पत्र वाचा, जसच्या तसं... 

मा. छत्रपती संभाजीराजे, कोल्हापूरमहोदय, आपण रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी किल्ले राजहंसगड बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हजर झाला त्याबद्दल सीमावासियांच्या भावना इथं व्यक्त करत आहे. मराठी भाषेसाठी गेली ६६ वर्ष मराठी माणूस निरंतर लाठ्याकाठ्या झेलत संघर्ष करत आला आहे. अनेक लोकांनी जीवाचे बलिदान देऊन हा संघर्ष तेवत ठेवला. राजहंस गडावर शिवमूर्तीची जी प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या पाठीमागे व त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी होती. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने आपणास या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती केली होती. 

कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली. त्याविरोधात मराठी माणसाने वेळोवेळी संघर्ष केला. प्रसंगी कारावासही भोगला. त्या संघर्षाचा संदर्भ देत आपणास त्या कार्यक्रमास हजर न राहण्याची विनंती करण्यात आली होती. आम्ही आजवर छत्रपतींच्या गादीचे वारस म्हणून तुम्ही आमच्यासोबत आहात असे मानत होतो. परंतु आमच्या ह्या समजाला तुम्ही हरताळ फासला आहे. तुमच्या उपस्थितीतच महाराष्ट्रातील आमदार धीरज देशमुख यांनी जय कर्नाटक उद्धार काढले. 

आपण छत्रपतींचे वारस म्हणवता तर मराठी विरोधी या घटनेचे आपण साक्षीदार होऊन सीमावासियांच्या आदरास अपात्र ठरत आहात. मराठी माणसाच्या लढ्याला तुम्हाला बळ देता येत नसेल तरी तुमच्याकडे आमचा आग्रह नाही. पण ज्या छत्रपतींचे नाव घेऊन सीमाभागात मराठी माणूस लढतो त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये ही विनंती. बेळगावातील मराठी माणसाचा लढा हा छत्रपतींच्या रयतेचा आहे. आपण त्यांचे पाईक मानले जाता तरी कृपया मराठी माणसाचा आपण घात करू नये अशी सीमा भागातील जनतेची इच्छा आहे.

कोल्हापूरकर जनतेने नेहमीच बेळगावकर जनतेची पाठराखण केली. आपण आपली भूमिका कोल्हापूरच्या जनतेसारखी ठेवाल अशी अपेक्षा. नाहीतर कोल्हापूरकर जनतेची आणि तुमची नाळ तुटली आहे काय? अशी शंका येण्यास वाव मिळतो. छत्रपतींच्या विचारांचे आम्ही वारस आहोत. त्यांच्या नावाने आम्ही लढा देत आहोत. आम्ही नक्कीच विजयी होणार आहे. तुम्ही आमच्यासोबत यावे ही श्रीचरणी प्रार्थना, कळावे

प्रकाश आप्पाजी मरगाळेखजिनदार, महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती