शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बेलवाडीत अश्वरिंगणाने फेडले डोळय़ांचे पारणे

By admin | Updated: June 29, 2014 22:43 IST

विठ्ठल-ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत वैष्णवांच्या जनसागरात, लाल मातीच्या गोल रिंगणधारी पांढ:याशुभ्र कडांवरून मानाचे अश्व धावले.

लासुण्रे : विठ्ठल-ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत वैष्णवांच्या जनसागरात, लाल मातीच्या गोल रिंगणधारी पांढ:याशुभ्र कडांवरून मानाचे अश्व धावले. उत्साही, आनंदमय वातावरणात रिंगण सोहळा आज बेलवाडी (ता. इंदापूर) मध्ये रंगला. रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद! असाच अनुभव या वेळी उपस्थितीत असणा:या प्रत्येकाने घेतला. दहा दिवसांचा पायी प्रवास, ऊनवा:याची, पावसाची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी  निगरुण  पांडुरगाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेला आहे.  सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, ङोंडेकरी, तुळशीवाल्या महिला, वारकरी, वीणोकरी पालखीभोवती हरिनामाचा गजर करीत रिंगण सोहळा पार पडला. यानंतर पालखी भाविकांच्या दर्शनासाठी गावात हनुमान मंदिरात विसावली.  या वेळी तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज सोहळा प्रमुखांचे पुतणो पुंडलिक महाराज देहूकर, छत्रपतींचे संचालक कांतिलाल जामदार, गव्हर्नमेंट काँट्रॅक्टर अजरुन देसाई, उपसरपंच अनिल खैरे, सदस्य नवनाथ गणगे, मार्केट कमिटीचे संचालक अनिल पवार, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार, संजय पवार, शहाजी ¨शदे, विठ्ठल जाचक, केशव नगरे आदी उपस्थित होते. गावक:यांच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी सर्व भाविकांसाठी पाणी, चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  (वार्ताहर)
 
4पांडुरंगा भेटायची आस, आतुरले नयन, विठ्ठल वाणी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकाराम ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत संत तुकाराममहाराज पालखी सोहळा सणसर मुक्काम आटोपून बेलवाडीच्या प्रवेशद्वाराजवळ सकाळी 8 वाजून 1क् मि. दाखल झाला. पालखीचे स्वागत बेलवाडीच्या सरपंच शोभा 
गणगे यांनी केले. 
4पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी हरिनामाच्या जयघोषात दाखल झाला. या वेळी गावात भक्तिमय वातावरणात रिंगणसोहळा सुरू झाला. सुरुवातीला बेलवाडीचे शहाजी मचाले यांच्या मानाच्या मेंढय़ांचे रिंगण पार पडले. 
4यानंतर सर्व दिडय़ांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. यानंतर विठू नामाचा गजर करीत ङोंडेकरी खांद्यावर पताका घेऊन धावले. त्यांच्यामागे डोक्यावर हंडा व तुळशी घेऊन महिला 
वारकरी  धावल्या. 
4नंतर विणोकरी धावले. शेवटी लक्ष लक्ष नयनांनी क्षण टिपावा असा क्षण आला. मानाचे अश्व धावण्यास सुरुवात झाली. या परिसरात फक्त विठू नामाचाच गजर कानावरती पडू लागला. एका पाठोपाठ एक असे तीन अश्व धावले.