शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

बोदवडमध्ये मोहरमला सुरुवात

By admin | Updated: October 10, 2016 19:46 IST

शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या हिंदू-मुस्लीम एकतेचा राज्यभर संदेश देणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या मोहरम सणाला येथे सुरूवात झाली आहे. मोहरमला येथे विशेष महत्त्व

ऑनलाइन लोकमतबोदवड, दि. 10 - शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या हिंदू-मुस्लीम एकतेचा राज्यभर संदेश देणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या मोहरम सणाला येथे सुरूवात झाली आहे. मोहरमला येथे विशेष महत्त्व आहे. मोहरमनिमित्त बोदवड शहरात ठिकठिकाणी मंडप टाकून सुमारे २३० सवाऱ्या बसविण्यात आल्या आहेत.यात हिंदू बांधवांनीही सवाऱ्या बसविल्या आहेत हे विशेष आहे. या सणासाठी राज्यभरातून भाविक बोदवड येथे येतात. मोठी आर्थिक उलाढाल या निमित्त होते. हिंदू-मुस्लीम एकात्मेचे दर्शन घडवणाऱ्या मोहरम सणाला येथे सुरूवात झाली. १० रोजीपासून सवाऱ्या बसविण्यात आल्या आहेत. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी बोदवड शहरात ठिकठिकाणी मंडप टाकून सजावट करण्यात आली आहे. मोहरमसाठी चांदीची नाल व फुलांच्या गलेबने सजवलेल्या सवाऱ्या (छड्या) बसवण्यात आल्या आहेत. या काळात सवाद्य मिरवणूक भगत मंडळीकडून काढण्यात येते.ही मिरवणूक पाहण्यासाठी मुंबई, सुरत, बुऱ्हाणपूर, अकोला व इतर ठिकाणाहून ग्भाविकांचे गर्दी होते. भगत मंडळींच्या घरी नातेवाईकांची गर्दी असते. मिरवणुकीची रंगत पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दीचा महापूर पाहायला मिळतो. फुलांची उधळण यावेळी केली जाते. चार दिवसाशीय या मोहरमच्या पहिल्या दिवशी मिरवणुकीने सुरूवात झाली. तिसऱ्या दिवशी नवस, मान फेडण्याचा विधी होतो. चौथ्या दिवशी मिरवणुकीने शासकीय दप्तरी नोंद कौन सवाऱ्या (थंड्या) विसर्जन केल्या जातात.

ब्रिटिश काळात नोंदबोदवड येथील सवाऱ्यांची ब्रिटीश शासन काळापासून शासकीय दप्तरात नोंद आहे. बोदवड पोलीस ठाण्यातही याची नोंद ठेवली जात आहे.

चार दिवसात माठी उलाढाल मोहरमच्या सवाऱ्यांच्या या चार दिवशीय उत्सवात शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते. कापड दुकानदार, किराणा, फुलहार, वाजंत्री व सराफ बांधवांचा चांगला व्यवसाय होतो. भाविक नवस व मान फेडण्यासाठी अत्तर, चांदीचा पाळणा, खोबरावाटी, फुलाची चादर, कपड्याचा गलेब असे खरेदी करुन चढवत असतात त्यातून लाखोंची उलाढाल होते.बोदडचा बाजार या सणासाठी सजला आहे.

हिंदू-मुस्लीम एकता वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या बोदवडला सुरू असलेल्या मोहरमच्या सवाऱ्यामध्ये हिंदू-मुस्लीम बांधव सवाऱ्याच्या निमित्ताने एकत्र जमून या उत्सवातून मिरवणुकीतून एकात्मतेचा संदेश देत आहेत. आजपावेतो याला गालबोट लागले नाही हे विषेश आहे. शहरातील सवाऱ्यामध्ये भगत मंडळीत गोपाल गुरूजी, जगू भगत, बुना भगत, अमृत भगत, पप्पू मारवाडी भगत, सलाम भगत, अमीर भगत, सुभान भगत, ताहेर भगत, नईम शहा भगत, संतोष खाटीक भगत, आकाश कल्याणकर, सागर, गुड्डू,नाना, रमेश भगत अशी ही भगत मंडळी असून त्यांना मस्तानबाबा असे संबोधले जाते. मोहरमच्या सवाऱ्यानिमित्त शहरातील हिंदू-मुस्लीम बांधव सलोख्याने एकत्र येवून हा उत्सव साजरा करतात. याची काटेकोर अंमलबजावणी ही पोलिसांकडून करण्यात येते यालाही वाढीव बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. हिंदुच्या सवाऱ्या अधिकआजघडीला बोदवड पोलीस ठाण्यात १२५ सवाऱ्यांची नोंद झाली आहे. त्यात ७५ सवाऱ्या या हिंदुच्या तर ५० सवाऱ्या मुस्लीम बांधवांच्या आहेत. हा शासकीय आकडा आहे. तर एकूण २३० सवाऱ्या बसविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. येथील सवाऱ्या व मोहरम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सवाऱ्या या प्रसिद्ध आहेत.मोहरम म्हटल्यानंतर बोदवडला उत्सवाचे जणू उधाणच आले आहे. यावर उच्च शिक्षित लोकांची ही असिम श्रद्धा आहे. ते या सवाऱ्याच्या मिरवणुकीत भगत मंडळीसोबत सहभागी झाले आहेत. त्यात पेशाने डॉक्टर, वकील, शिक्षक व सरकारी नोकरदार वर्गाची ही संख्या मोठी आहे.