शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

बीडमध्ये तरुणावर गोळीबार थोडक्यात बचावला, प्रसंगावधान राखल्याने 3 फायर चुकविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 22:24 IST

क्रिकेटचा सराव करुन मित्रासोबत घरी निघालेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी 4 फायर केले. तरुणाने प्रसंगावधान राखत 3 गोळ्या चुकविल्या तर 1 गोळी त्याच्या पोटाला चाटून गेली.

बीड : क्रिकेटचा सराव करुन मित्रासोबत घरी निघालेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी 4 फायर केले. तरुणाने प्रसंगावधान राखत 3 गोळ्या चुकविल्या तर 1 गोळी त्याच्या पोटाला चाटून गेली. यामध्ये जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी मोठा जमाव रुग्णालय परिसरात जमला होता. याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता.शेख सर्फराज अब्दुल सलाम (वय ३६, रा.भालदारपुरा, बीड) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. सर्फराज हे नियमित जिल्हा क्रीडा संकुलात क्रिकेटचा सराव करण्यासाठी मित्रांसोबत येतात. रविवारीही त्याने सराव केला. ७ च्या सुमारास तो आपल्या दुचाकीवरुन (एमएच२३/३५५५) वरुन मित्र मोहसीन (मोमीनपुरा) सोबत घरी निघाला होता. सुभाष रोड, डॉ. आंबेडकर पुतळामार्गे चांदणी चौकात येताच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर ४ फायर केले. परंतु सर्फराजने प्रसंगावधान राखून ३ गोळ्या चुकविल्या तर १ गोळी त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाटून गेली. यामध्ये जखमी झालेल्या सर्फराजला तात्काळ भाऊ शेख रियाज यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ही माहिती वा-यासारखी पसरताच मित्र, नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.त्यामुळे याठिकाणी मोठा जमाव जमला होता. जमावाला पांगविण्यासाठी राज्य राखीव दलाचे जवान बोलाविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलझालेला नव्हता.  पोलीस अधिका-यांची धाव घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी रुग्णालयात धाव घेतली. सर्फराजसोबत असलेल्या मोहसीनकडून त्यांनी घटनेची माहिती घेतली.त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनीही रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. शहर ठाण्याचे सय्यद सुलेमान हेही याठिकाणी बंदोबस्तासह हजरझाले.  सर्फराज ३ मतांनी झाला होता पराभूत नगरपालिका निवडणुकीत सर्फराज शेख हा काकू-नाना आघाडीच्या वतीने प्रभाग क्र. १७ मध्ये उमेदवार होता. सय्यद सादेक उज्जमा यांच्याकडून त्याचा अवघ्या ३ मतांनी पराभव झाला होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात काकू-नाना आघाडीच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी धाव घेतली होती.कारण अस्पष्टसर्फराज याच्यावर राजकीय वादातून हल्ला झाला की, इतर कारण आहे? याबाबतकुठलीही अधिकृत माहिती उशिरापर्यंत हाती लागली नाही. परंतु सर्फराजवर झालेल्या हल्ल्याबद्दल शहरात वेगवेगळ्या चर्चेला ऊत आला होता.गोळीबाराची दुसरी घटना-काही दिवसांपूर्वीच अंकुशनगर भागात दोन गटातील वादातून गोळीबार झाल्याचीघटना घडली होती. आता पुन्हा ही घटना घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हे रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.