शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही; देशमुख कुटुंबीयांना CM फडणवीसांचा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 22:04 IST

आम्हाला आतापर्यंत झालेल्या तपासाचा चौकशी अहवाल २ दिवसात दिला जाईल असं सांगितले आहे असंही धनंजय देशमुख यांनी माध्यमांना सांगितले आहे. 

मुंबई - बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आज देशमुख कुटुंबीयांनी सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही. देशमुख कुटुंब जे अधिकारी सांगतील त्यांना एसआयटीत घेऊ असा शब्द फडणवीसांनी देशमुख कुटुंबाला दिला आहे. या भेटीवेळी आमदार सुरेश धस हेदेखील उपस्थित होते. 

या भेटीनंतर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्‍यांनी अधिवेशनात पहिल्या दिवशी जे सांगितले तेच आज आश्वासन दिले. कुठल्याही आरोपीला सोडणार नाही. गुन्हेगाराला माफ केले जाणार नाही हे दाखवून दिले जाईल. या प्रकरणावर आम्ही मुख्यमंत्र्‍यांशी चर्चा केली. आमच्याकडे जे काही होते ते दाखवले आहे. आम्हाला न्याय हवा. न्यायाची भूमिका आम्ही मागितली आहे. हा तपास निष्पक्षपातीपणे झाला पाहिजे. या गुन्ह्यात कुणीही मोठा असला तरी त्याला शिक्षा होणार असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही कुणाच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. मुख्यमंत्री फडणवीस हा त्यांचा निर्णय आहे. परंतु आम्हाला न्याय हवा. आम्ही एफआयआरनुसार त्यांच्याशी चर्चा केली. जी घटना घडली त्या काळातील सर्वांचे सीडीआर काढा त्यानुसार तपास करा. गेल्या ४-५ महिन्यातील FIR दिलेत. आम्हाला आतापर्यंत झालेल्या तपासाचा चौकशी अहवाल २ दिवसात दिला जाईल असं सांगितले आहे असंही धनंजय देशमुख यांनी माध्यमांना सांगितले आहे. 

दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड, हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावा, या मागणीसह धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. परंतु वकिलाने विश्वासात न घेताच ही याचिका केल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केला. न कळवता वकिलाने स्वतःच याचिका दाखल केली, असा निर्वाळा धनंजय देशमुखांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडे