शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

“बाबांना वाचवू शकलो नाही, पण आता मनोज जरांगेंना काही होऊ देणार नाही”: वैभवी देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:10 IST

Vaibhavi Deshmuke Meet Manoj Jarange Patil: लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की, दादांच्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, असे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.

Vaibhavi Deshmuke Meet Manoj Jarange Patil: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली होती. मनोज जरांगे पाटील यांनीही सातत्याने ही मागणी लावून धरली होती. मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीकडे वळवला असून, आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात बीडचे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने सहभाग घेत मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी यानंतर प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे यांच्यासोबत अनेकांनी त्यांच्या आमरण उपोषणात सहभाग घेतला आहे. मनोज जरांगे यांच्यासह अनेकांची प्रकृती तिसऱ्या दिवशी खालावली आहे. बीड प्रकरणात सक्रीय असलेल्या मनोज जरांगे यांना साथ देण्यासाठी मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख अंतरवाली सराटी येथे गेले आहेत. यासह संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही आमरण उपोषणस्थळी पोहोचलेले आहेत. मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर वैभवी देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. 

मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेतील. दादा केवळ आमच्या कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कुटुंबाचा भाग आहेत. आम्ही दादांना काही होऊ देणार नाही. माझे वडील तर गेले, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. पण दादांना आम्ही काही होऊ देणार नाही. माझ्या वडिलांना न्याय मिळावा आणि दादांच्या आरक्षणासाठीच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे. दादांची तब्येत खूप खालावली आहे. त्यांना बोलतानाही येत नाही. आमच्या आज्जीने त्यांना आग्रह केल्यानंतर त्यांनी एक घोट पाणी प्यायले. आताही ते सलाइनसाठी नकार देत आहेत, असे वैभवी देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आरक्षण मिळायला हवे. आम्ही दादांना काही होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की, दादांच्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या. कारण दादांची तब्येत खूप बिघडत आहे, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील