शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

अंधत्वावर मात करत ‘ती’ बनली फिजिओथेरपिस्ट

By admin | Updated: January 11, 2017 05:16 IST

अंधत्वावर मात करत आणि व्यवस्थेविरोधात न्यायालयीन लढा देऊन नालासोपाऱ्यातील कृतिका पुरोहित या तरुणीने फिजिओथेरपिस्ट ही पदवी संपादन करून देशातील पहिली

 शशी करपे / वसईअंधत्वावर मात करत आणि व्यवस्थेविरोधात न्यायालयीन लढा देऊन नालासोपाऱ्यातील कृतिका पुरोहित या तरुणीने फिजिओथेरपिस्ट ही पदवी संपादन करून देशातील पहिली अंध डॉक्टर होण्याचा मान मिळविला. अंधत्वाचे कारण देऊन तिला वैद्यकीय शिक्षणापासून रोखणाऱ्या व्यवस्थेला तिने ही पदवी मिळवून चपराकही लगावली आहे. ती नालासोपाऱ्यात आपल्या आई-वडिलांसोबत राहते. तिसरे अपत्य असलेल्या कृतिकाला वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी दृष्टी गमावावी लागली. तिच्या डोळ्यांच्या शिरेला (आॅप्टिकल नर्व्हज) इजा पोहोचली होती. दृष्टी गमावली तरी तिने जिद्दीने अंधत्वावर मात करीत शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. इतकेच नाही, तर डॉक्टर होण्याचे स्वप्नही मनाशी बाळगले होते. पालकांनीही तिला साथ दिली. सीईटीत दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या प्रवर्गाच्या गुणवत्ता यादीत ती पहिल्या दहात आली, तर तिला वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश द्यावा, असा निर्णय कोर्टाने दिला. तिने १२१ गुण मिळवून दिव्यांगांच्या गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला. मदतनीसाच्या साह्याने तिने परीक्षेत यश संपादन केले. मात्र, सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळविताना तिला पुन्हा अडथळा आला. या अभ्यासक्रमात लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश असल्याने सरकारी कॉलेजमध्ये तिला प्रवेश नाकारण्यात आला. कृतिकाने पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात धाव घेतली. यावेळीही न्यायालयाने तिला प्रवेश दिला जावा, असा आदेश दिला. त्यानंतर तिने मुंबई येथील सेठ जीएस मेडिकल महाविद्यालयातून फिजिओथेरपीचा चार वर्षांचा अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत पूर्ण केला. सहा महिने याच महाविद्यालयात तिने इंटर्नशिप पूर्ण करून ‘बॅचलर आॅफ फिजिओथेरपी’ ही पदवी प्राप्त केली. सध्या ती एका खासगी रुग्णालयात ‘फिजिओथेरपिस्ट’ म्हणून काम करत आहे. न्यायालय व पालकांच्या पाठिंब्याशिवाय मी यशस्वी होऊ शकले नसते, अशी कृतज्ञतेची भावना तिने व्यक्त केली आहे. प्रवेशासाठी न्यायालयीन लढा‘नॅब’च्या मदतीने तिने मुंबईतील शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. २०१०मध्ये बारावीनंतर तिला फिजिओथेरपी या वैद्यकीय अभ्यासक्रमाची सीईटी देण्याची इच्छा होती. पण, ‘डायरेक्टर आॅफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ने ती अंध असल्याचे कारण देऊन तिला प्रवेश नाकारला. तो प्रवेश मिळविण्यासाठी तिने मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने तिला परीक्षेला बसू देण्याचा आदेश दिला.