शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

बोलत नाही म्हणून प्रेयसीने प्रियकराच्या अंगावर फेकले अॅसिड

By admin | Updated: June 10, 2017 09:03 IST

प्रेमाला, लग्नाला नकार दिला म्हणून तरुणाने तरुणीच्या चेह-यावर अॅसिड फेकल्याच्या अनेक घटना आतापर्यंत आपण ऐकल्या असतील.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10 -  प्रेमाला, लग्नाला नकार दिला म्हणून तरुणाने तरुणीच्या चेह-यावर अॅसिड फेकल्याच्या अनेक घटना आतापर्यंत आपण ऐकल्या असतील. पण शुक्रवारी संध्याकाळी मुंबईच्या गोरेगावमध्ये याउलट घटना घडली. प्रियकर बोलायचा बंद झाला म्हणून संतापलेल्या प्रेयसीने प्रियकरावर अॅसिड फेकले. या हल्ल्यात प्रियकर ओमसिंग सोलंकी गंभीर जखमी झाला असून त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे. 
 
गोरेगावच्या एमजी रोडवर असलेल्या एका दुकानात ओमसिंग नोकरीला आहे. याच दुकानात काम करणा-या एका तरुणीसोबत त्याचे सूर जुळले होते. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. प्रेमाचे गोड गुलाबी दिवस सरल्यानंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. अशाच एका वादातून ओमसिंगने प्रेयसीशी बोलणे बंद केले होते. तरुणीने ओमसिंगची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 
 
शुक्रवारी संध्याकाळी दुकानात असताना तरुणीने पुन्हा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दीक वादावादी झाली. आपण इतके नमते घेऊनही ओमसिंग ऐकत नसल्याने तरुणीचा संताप अनावर झाला. तिने ओमसिंगवर बोच-या शब्दाचे प्रहार सुरु ठेवतच काचेच्या बाटलीतून सोबत आणलेले अॅसिड त्याच्या अंगावर फेकले व तिथून पळ काढला. स्थानिकांनी गंभीर जखमी झालेल्या ओमसिंगला रुग्णालयात दाखल केले. गोरेगाव पोलीस फरार तरुणीचा शोध घेत आहेत.