मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच राजकीय पक्षांमध्ये प्रकल्पांची पळवापळवी सुरू झाली आहे़ त्यात प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच राज्य सरकार श्रेय लाटत असल्याची बोंब आता शिवसेनेने सुरू केली आहे़ त्यामुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे़निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पालिकेने काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले़ यामध्ये कोस्टल रोड, सुपर स्पेशालिटी रुग्णालये व मुख्य रस्त्यांना जोडण्याच्या प्रकल्पांचा समावेश आहे़ राज्य सरकार हे प्रकल्प आपल्या नावावर लाटत असल्याचा आरोप महापौर सुनील प्रभू यांनी केला आहे़ कोस्टल रोडचा प्रस्ताव केंद्राकडे रखडला असून, याबाबतची सर्व परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे़ तसेच भांडुप येथील ६५० खाटांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी पुनर्निविदा मागवल्या असून, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ताही पालिकाच बांधणार असल्याचे महापौरांनी ठणकावले़ (प्रतिनिधी)
निवडणुकीपूर्वी श्रेयाची लढाई!
By admin | Updated: June 18, 2014 05:16 IST