शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'अटल सेतू'वरून श्रेयवादाची लढाई; ५० वर्ष रखडलेला प्रकल्प अखेर कुणी मार्गी लावला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 15:20 IST

२४ डिसेंबर २०१६ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. 

मुंबई - बहुचर्चित शिवडी न्हावा सी लिंक अटल सेतू हा मार्ग अखेर १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. देशातील सर्वात लांब सागरी सेतू असलेला हा प्रकल्प आमच्यामुळेच मार्गी लागला अशी श्रेयवादाची लढाई उद्धव ठाकरे गट आणि भाजपात सुरू झाली आहे. ठाकरे गटाकडून सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर भाजपाकडूनही देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत या प्रकल्पाला गती मिळाली असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ५० वर्ष रखडलेला हा प्रकल्पाला गती नेमकी कधी मिळाली असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. 

खरेतर मुंबई आणि रायगड या २ जिल्ह्यांना जोडणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प १९६३ मध्ये सर्वात आधी समोर आला होता. विल्बर स्मिथ अँड असोसिएट्सकडून त्याकाळात परिवहन मंत्रालयाला एक स्टडी रिपोर्ट सादर केला होता. त्यात या पूलाबाबत संकल्पना मांडली होती. त्यानंतर १९७२ आणि ७८ या काळातही हा संभाव्य पूल उभारण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्यात आली. मात्र त्यानंतर थंडबस्तानात गेलेला हा प्रकल्प पुन्हा १९९० मध्ये नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २००९ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे याची जबाबदारी सोपवली. 

या प्रकल्पामुळे नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील अनेक भागाचा विकास होणार होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होते. त्याचसोबत मुंबई व नवी मुंबई, रायगड, कोकण यातील अंतर कमी झाल्यामुळे इंधन आणि वाहतूक खर्चात बचत होणार होती. त्यामुळे या प्रकल्पाचे महत्त्व ओळखून २५ जानेवारी २०१६ मध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि वने विभागाच्या परवानगीनंतर या प्रकल्पाला गती मिळाली. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पासाठी जपानच्या जायका या संस्थेकडून कर्ज मिळवण्यात यश मिळवले. जायकाकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास परस्पर कर्ज घेण्यास केंद्र सरकारनेही मान्यता दिली. त्यानंतर या प्रकल्पासाठी टेंडर मागवण्यात आले. त्यात ३ टप्प्यांसाठी ३ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर २३ मार्च २०१८ रोजी तत्कालीन सरकारने कार्यारंभ करण्याचे आदेश दिले आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. 

२४ डिसेंबर २०१६ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.  त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले. कोरोनामुळे अनेक प्रकल्प रखडले. हा प्रकल्प सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु कोरोनामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास १ वर्ष विलंब झाला. त्यात आता उद्धव ठाकरे यांनी अटल सेतू महामार्गावर पहिला गर्डर लॉन्च केला. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून ८५ टक्के काम पूर्ण केले असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. तर कुठलेही राष्ट्र वा त्या देशाची सरकारी वित्तीय संस्था दुसऱ्या देशातील एका राज्याला किंवा प्राधिकरणाला कर्ज देत नाही. पण देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना विनंती करत थेट जपान सरकारकडून प्राधिकरणाला कर्ज देण्याची परवानगी मागितली. त्यावर कॅबिनेटमध्ये मोदींनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याने जपानने या प्रकल्पाला कर्जपुरवठा केला. या प्रकल्पाला झालेला खर्च पाहता राज्याच्या तिजोरीतून हा फंड दिला असता तर ग्रामीण भागात कुठलाही विकास करणे शक्य झाले नसते. जायकाकडून मिळालेल्या कर्जामुळे वेगाने काम सुरू झाले त्यातून हा प्रकल्प आज साकारला असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :sewri nhava shevaशिवडी - न्हावा शेवा अटल सेतूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे