शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ही लढाई अस्तित्वाची आहे, अन्यथा हुकूमशाही प्रवृत्ती फोफावतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 05:44 IST

पृथ्वीराज चव्हाण । मतभेद दूर करावेच लागतील

- अतुल कुलकर्णी

मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादीत कटुता कधीच नव्हती, पण दोघांचे परंपरागत दृष्टिकोन वेगळे होते. त्यातून मतभेद व्हायचे. मात्र, आमच्या पराभवाने ग्रामीण भागातील नेतृत्वाचे व सहकारी चळवळीचे खच्चीकरण झाले. आताची लढाई व्यक्तींविरोधात धर्मनिरपेक्ष शक्तींच्या अस्तित्वासाठीची आहे. ती एकत्रित न लढल्यास हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपा हुकूमशाहीचे राजकारण व अराजकता निर्माण करेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

भाजपा शिवसेनेची युती झाली. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत राजकीय गणिते बदलतील, का? या प्रश्नावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी गेली चार वर्षे भाजपाकडून एवढा अपमान स्वीकारून युती केली. मन मारून त्यांना अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बसावे लागले. हे का केले, ते कार्यकर्त्यांना पटवून देणे त्यांना अशक्य आहे. दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. जे लोक कालपर्यंत एकमेकांना दंड थोपटून दाखवित होते, ते आज लगेच एकत्र येतील, असे समजणे चुकीचे आहे.भाजपाविषयी ते म्हणाले की, हिंदुत्ववादी विचारांची राज्यात एकापेक्षा जास्त संघटना असू नयेत, अशीच भाजपाची धारणा आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा सुरू केली. परिणामी, उद्धव ठाकरे यांनीही टोकाची भूमिका घेतली. आज देशात विरोधकांच्या महाआघाडीचे वारे जोरात वाहत आहे. उत्तर प्रदेशात आपण पराभूत होणार, हे भाजपाच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच तर भाजपाने मजबुरीतून शिवसेनेला सोबत घेतले आहे, पण घेताना शिवसेनेचे नुकसान कसे होईल याचेही डाव भाजपा खेळली आहेत. प्रत्येक निवडणूक पैशाने जिंकायची, अशी भाजपाची वृत्ती आहे. आम्ही ते करु शकत नाही.

काँग्रेस आणि राष्टÑवादीतही आलबेल नाही, कुरबुरी आहेत, याकडे लक्ष वेधता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्ही ४८ पैकी प्रत्येकी २० जागा वाटून घेतल्या आहेत. काही जागा मित्रपक्षाशी चर्चा करून ठरवू. भाजपाचे हुकूमशाही सरकार घालवायचे असेल तर आम्हाला अंतर्गत मतभेद दूर करावे लागतील. राष्टÑवादीला औरंगाबाद हवे आहे, आम्हाला अहमदनगर पाहिजे, सांगली, पुण्यातून कोण उभे राहायचे याची चर्चा चालू आहेच. पण स्थानिक कुरबुरी दूर सारून आम्हाला ही निवडणूक एकत्रितपणे लढावी लागेल. पूर्वी इंदिरा गांधी असताना काँग्रेसच्या हात या चिन्हावर लोक शिक्का मारायचे. आज परिस्थिती वेगळी आहे. मधल्या काही वर्षांमध्ये राजकीय पक्षांचे महत्त्व कमी होत गेले आणि नेते मोठे होत गेले. माझ्याकडे पैसा आहे, ताकद आहे, मग मी निवडून येऊ शकतो, असे म्हणणारे लोक वाढले, अशा लोकांनी अनेक पक्षांना वेठीला धरले. त्यातून पक्ष दुबळे होत गेले. भाजपानेही हेच केले. अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आरएसएसचे वर्चस्व नको आहे. त्यातून त्यांनी तुल्यबळ चेहरे पुढे करणे सुरू केले. याचा फटका त्यांनाही बसणार आहे.

मुंबई काँग्रेसमधील वादाविषयी ते म्हणाले की, घर म्हटले की वाद होतातच. पण पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे त्यात लक्ष घालतील आणि मुंबई अध्यक्ष निवडणुकीला उभे राहिल्यास त्या काळात कार्याध्यक्ष म्हणून अन्य कोणाला तरी जबाबदारी दिली जाईल.पूर्वी आम्ही जसे होतो, तशी आता भाजपाची अवस्था झाली आहे. स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना दूर सारून आमच्याकडून आयात केलेल्यांच्या मागे भाजपा पैशाची ताकद लावून त्यांना विजयी करताना दिसली आहे. त्यातून भाजपाने आरएसएसच्या कार्यकर्त्यांवरही अन्याय चालविला आहे.प्रकाश आंबेडकरांविषयी ते म्हणाले...मला त्यांची भूमिका प्रामाणिकपणाची वाटत नाही. त्यांनी मतविभाजनाचा विडाच उचलेला आहे. सत्ताधारी भाजपाच्या फायद्याची खेळी ते खेळत आहेत. म्हणून तर मुंबईतील शिवाजी पार्कवर त्यांच्या व ओवेसींच्या सभेसाठी परवानगी दिली जाते आणि राहुल गांधी यांच्या सभेसाठी ती नाकारली जाते. यातच सगळे काही आले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा