शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:51 IST

Sanjay Raut Sharad Pawar Sunetra Pawar Baramati By Elections: अजित पवार असोत, सुनेत्रा पवार असोत; तुम्ही राजकारणात 'पवार' म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळेच"

Sanjay Raut Sharad Pawar Sunetra Pawar Baramati By Elections: अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यावर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले. खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी राज्याच्या राजकारणात पाऊल ठेवले. आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून त्या आमदार म्हणून विधानसभेत जातील हे जवळपास निश्चित आहे. ही निवडणूक बिनविरोध होऊ शकलेली नाही, पण सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. शरद पवार यांनी स्वत: फोन केल्यावर काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला. तसेच, आता सुनेत्रा पवारांसाठी सुप्रिया सुळे प्रचार करणार असल्याचेही सांगितले जात आहे. याचदरम्यान, उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची विधाने केली.

शरद पवारांनी जर बारामती उभी केली नसती तर...

खासदार संजय राऊत म्हणाले, "शरद पवार यांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? मोदी आणि शाह यांनी कुणालाही पदे दिली असतील, पण शरद पवार यांनी जर बारामती उभी केली नसती; तर त्यापुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कुठलंच स्थान मिळालं नसतं. त्यामुळे माणसाने किमान कृतज्ञता ठेवायलाच हवी. तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केलात तरीही तुमच्या पाठीशी पवारांची पुण्याई आहे. ही निवडणूक अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून मविआ लढवत नाहीये. पण पुढली निवडणूक बिनविरोध नसेल."

पवारांमुळे आपण आहोत हे विसरू नका!

"अजित पवार असोत, सुनेत्रा पवार असोत किंवा इतर कोणीही पवार असोत; तुम्ही कितीही मोठे झाले असाल तरीही राजकारणात 'पवार' म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे उभे आहात, याचा विसर पडता कामा नये. बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे या नावाला वैभव आणि गौरव निर्माण करून दिला, त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत. तसेच बारामती म्हणजे शरद पवार. सध्याची निवडणूक हा पवार कुटुंबाचा कौटुंबिक विषय आहे. पण तरीही पवारांमुळे आपण आहोत हे इतरांनी लक्षात ठेवायला हवे," असे संजय राऊतांनी सुनावले.

सुनेत्रा पवार भावी मुख्यमंत्री?

"अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आले नाही. पण सुनेत्रा पवार यांना जर भाजपा मुख्यमंत्री करणार असतील, तर तो भाजपच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याआधी एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी सुनेत्रा पवारांना राजकीय वारसदार बनवून जात असल्याचे या बोलण्यातून दिसते," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut: Pawar built Baramati, or no Pawar in Maharashtra.

Web Summary : Sanjay Raut stated that Sharad Pawar's work in Baramati enabled the Pawar family's political success in Maharashtra. He emphasized the importance of gratitude towards Sharad Pawar, regardless of individual achievements. Raut also speculated on BJP potentially considering Sunetra Pawar for Chief Minister.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीElectionनिवडणूक 2026